हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले केंद्र सरकार हे देशातील नागरिकांचा विचार करून अनेक योजना आणलेल्या आहेत. अशीच एक योजना सरकारने आपल्या देशात आणलेली आहे. देशात सौर ऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने सोलर पॅनल बसवण्यासाठी योजना आणलेली आहे. लोकांना त्यांच्या घरावर रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदानाचा स्वरूपात काही रक्कम दिली जाणार आहे. देशातील नागरिकांना सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. जर तुम्ही सोलर पॅनल बसवले, तर मोफत वीज निर्मिती करू शकता. आणि सरकारकडून सबसिडीच्या रकमेचा देखील लाभ घेऊ शकता.
अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवले, तर सरकारकडून अनुदान देखील मिळणार आहे. तुम्ही जर हे सौर पॅनल लावले तर पुढील 20 ते 21 वर्षापर्यंत वीज निर्मिती करू शकता. तसेच कमाई देखील करू शकता. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऊर्जा घेण्यासाठी अर्ज करू शकता.
अनुदानाची रक्कम किती ?
या योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर जर तुम्हाला सौर पॅनल बसवायचे असेल, तर सरकारकडून अनुदान मिळते. ही अनुदानाची रक्कम व्यक्तीला क्षमतेनुसार दिली जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 3 किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला जवळपास 78 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी होणार आहे.
सोलार पॅनल बसवण्यासाठी पात्रता काय आहे ?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. तसेच सोलार पॅनल हे देखील भारतात बनवलेला असावा. देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँक पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या घराच्या छताचे फोटो