माढा तालुक्यातील भीषण अपघातात दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात एकीकडे रस्ते सुसज्ज पद्धतीने बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे अपघाताचे (accident) सत्र मात्र कमी होताना काही दिसत नाहीत.अशीच एक दुर्दैवी घटना सोलापूरमधील माढा तालुक्यात घडली आहे. यामध्ये माढा तालुक्यातील भीषण अपघातात दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर त्या दोन्ही भावांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माढा तालुक्यातील सुर्ली येथून शिराळा येथे हे दोघे भाऊ दळण घेऊन घरी जात असताना हा अपघात (accident) झाला. दळण घेऊन हे दोन्ही भाऊ आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. विठ्ठला अतुल कदम वय 16 वर्ष आणि रणजीत अतुल कदम वय 14 वर्षे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

डॉक्टरांनी या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही आणि या दोन्ही भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताने (accident) संपूर्ण माढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या अपघातांनी घरातील दोन तरुण मुलांच्या मृत्यूने कदम कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!