दहा दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा शासकीय निवासस्थानाचे नळ तोडण्यार असल्याचा मनसेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : महानगरपलिकेतर्फे शहरात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करण्यात यावा यासंदर्भात, महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या दहा दिवसात मनपाने निर्णय घेऊन आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करावा तसेच सध्या वसूल करत असलेली पाणी पट्टी कमी करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा मनपा प्रशासक यांच्या शासकीय निवासस्थानाचे नळाचे कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेतर्फे शहरवासियांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. शहरामध्ये आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने मागील दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थती असताना जायकवाडी धरणात पाणी पुरवठ्यासाठी जलसाठा अल्प प्रमाणात असल्यामुळे त्यावेळी मनपा प्रशासनाने चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. कालांतराने पाच दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागला. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून मनपा प्रशानतर्फे आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

राज्यात किंबहुना देशात सर्वाधिक पाणीपट्टी भरूनही औरंगाबाद तहानेलेलेच !

सिटी वॉटर युटीलीटी कंपनी व महानगरपालिका यांच्यात झालेल्या २०११ च्या करारानुसार पाणीपट्टीत दरवर्षी १० टक्के वाढ करण्याचे ठरले होते. सिटी वॉटर युटीलीटी कंपनीने १ एप्रिल २०१२ पासून काम सुरु करावे अशी नोटीस मनपातर्फे दिली परंतु कंपनीने प्रत्यक्ष काम १ सप्टेंबर २०१४ पासून हाती घेतले याचा अर्थ २०११ ते २०१४ या तीन वर्षात सिटी वॉटर युटीलिटी कंपनी या दोघांनी पाणीपुवठ्यासाठी कोणतेही नवे काम सुरुकेले नव्हते. असे असून देखील २०११ साली १८०० रु. असलेली वार्षिक पाणीपट्टी मनपाने पुढील तीन वर्षात अनुक्रमे रु.२५००, रु.२७५०, रु.३०५० एवढी वाढवली पुढे २०१५ साली या पाणीपट्टीत आणखीन वाढ करून रु. ३३५५ एवढी केली त्यानंतर २०१६ पाणी पुरवठा खाजगीकरणाचा ठराव रद्द केला गेला. यात आज रोजी वार्षिक पाणीपट्टी ४०५० एवढी आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पाणीपट्टी भरूनही औरंगाबादकरांना पाण्यासाठी सतत तरसावे लागत आहे.

Leave a Comment