मुलानेच केला बापाचा खून, कराड तालुक्यातील घटना; कारण वाचून तुम्हांलाही बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील जखीणवाडी येथे घडली आहे. व्यसनी मुलाला दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने पित्याचा डोक्यात पार घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. जखिणवाडी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागे हा खून करण्यात आला.

शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय- 70) असे खून झालेल्या पित्याचे नाव असून अर्जुन शिवाजी पाटील (वय- 36) असे संशयित मुलाचे नाव आहे. मुलाने दारूसाठी वडीलांकडे पैसे मागितले होते. मात्र पैसे न दिल्याने चिडून जाऊन मुलाने वडीलांच्या डोक्यात पार घातली. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी संशयित मुलगा अर्जुन पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.