पोटच्या मुलानेच केला बापाचा खून; लाकडी दांडक्याने मारहाण करत घेतला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचा खून केल्याची खळबळजनक घटना कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली या गावात घडली आहे. रागाच्या भरात मुलाने बापास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतलं आहे.

मुलाच्या आणि वडिलांच्या भांडणातून मुलाने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. क्रूर मुलाने संतापाच्या भरात लाकडी दांडक्याने मारहाण करत जन्मदात्या पित्याचा खून केला. तानाजी लक्ष्मण होवाळ वय 65, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड असे खून झालेल्या वडिलांचे नाव असून अभिजीत उर्फ पप्या होवाळ असे आरोपी मुलाचे नाव आहे.

याबाबत संजय शामराव सरगडे वय 53, रा. कोपर्डे ता. कराड यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. यांनतर कराड तालुका पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोटच्या लेकानेच जन्मदात्या पित्याचा खून केल्याने परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.