जिद्द असावी तर अशी !; 22 व्या वर्षी सोनाली पहिल्याच प्रयत्नात झाली IPS अधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहानपणीच ठरवलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. ते पूर्ण करण्यासात काहींना लवकर यश मिळत तर काहींना आपलं आयुष्य खर्ची करावं लागत. मात्र, आपल्या स्वप्नाला जिद्दीची जोड देत अभ्यास करून वयाच्या 22 व्या वर्षीच IPS अधिकारी होण्याचा बहुमान सोनाली परमार या तरुणींनी पटकावला आहे. पाहूया तिच्या जिद्दीची यशोगाथा…

2021 च्या UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि यात एकूण 685 उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यापैकी एक भोपाळची रहिवासी सोनाली परमार देखील होती. यूपीएससी परीक्षेसाठी तिने पहिलाच प्रयत्न केला आणि त्यात तिने यशाचा झेंडा रोवला आहे.

Sonali Parmar

पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश

आयपीएस अधिकारी झालेल्या सोनाली परमारने खूप कष्ट घेतले. मुळात सोनाली ही सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. ती इच्छावर जिल्ह्यातील सिहोर तहसीलमधील पालखेडी या छोट्याशा गावातील रहिवासी असल्याने गावात तसे पाहिले तर जास्त काही शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. मात्र, गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर सोनालीने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणीही ती टॉपर आली. इतकेच नाही तर तिने वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा दिली आणि यातही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.

Sonali Parents

आई-वडील कृषी अधिकारी

सोनाली परमारचे वडील डॉ. राजेंद्र परमार हे कृषी विभागात अधिकारी आहेत. तर त्यांची आई अर्चना परमार कृषी विभागात सहाय्यक संचालक आहेत. ग्रामीण भागात वाढलेल्या सोनाली परमारने आई वडिलांप्रमाणे आपणही अधिकारी व्हायचे असे ठरवले. आणि तिने जिद्दीने अभ्यास करत आयपीएस अधिकारी बनून सर्वांनाच थक्क केले आहे.

Sonali Parmar

अभ्यास करताना महत्वाची घेतली ‘ही’ काळजी

सोनालीने लहानपणापासून घरात अधिकाऱ्यांचे शब्द ऐकले. यामुळेच तिने लहानपणी आपणही IAS/IPS होण्याचे स्वप्न पाहिले. तीने रात्रंदिवस अभ्यास करायला सुरुवात केली. काहीही झाले तरी आपण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हायचेच असे ध्येय तिने मनाशी केले होते. पुढे तिने सतत 12 ते 14 तास अभ्यास केला. अभ्यास करताना तिने मोबाईल फोनपासूनही अंतर ठेवले. कोणत्याही परिस्थितीत आपण मोबाईल वापरायचा नाही, असे सोनालीने ठरवले आणि तिने तसे करत अभ्यास केला.

Sonali Parmar

अभ्यास करताना सोनाली स्वतःसाठी रोज ठरवायची एक ध्येय

सोनाली परमारने तिचा अभ्यास करताना काही खास गोष्टी केल्या. ती रोज स्वतःसाठी एक ध्येय ठरवायची आणि ते साध्य करण्यासाठी खूप मेहनत करायची. तिने UPSC परीक्षा 2021 मध्ये उत्तीर्ण होत 187 वा क्रमांक मिळवला. ती नेहमी चालू घडामोडींमध्ये स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी ती रोज वर्तमानपत्रे वाचायची आणि त्यातून अभ्यास करायची.

प्रीती मैथिल

IAS अधिकारी यांच्यापासून मिळाली प्रेरणा

सोनाली परमारने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीची असल्याने तिचा कलही शेतीकडे होता.तिने जबलपूर विद्यापीठातून B.Sc अॅग्रीकल्चरमध्ये पदवी प्राप्त केली. पुढेशासकीय क्षेत्रात मध्ये जाण्याची प्रेरणा जिल्ह्यातील पहिल्या IAS अधिकारी प्रीती मैथिल यांच्याकडून सोनालीला मिळाली.