हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sonalika Tractors : शेतीसाठी ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या खूप उपयोगाचे साधन आहे. देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी सोनालिका ग्रुप आहे. आता Sonalika Tractors कडून त्यांच्या संपूर्ण ट्रॅक्टर श्रेणींच्या किंमती कंपनीच्या वेबसाइटवर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, याआधी ट्रॅक्टरच्या किंमती जाहीर केल्या जात नव्हत्या. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र आता कंपनीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत Sonalika Tractors चे सहव्यवस्थापकीय संचालक असलेल्या रमण मित्तल यांनी सांगितले कि, “सध्या काळात शेतकरी खूप प्रगतीशील झाले आहेत. तसेच वाढत्या डिजिटलायझेशमुळे त्यांच्याकडे चांगली माहिती देखील उपलब्ध होते आहे. ट्रॅक्टरच्या किंमती ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ट्रॅक्टरच्या किंमतींशी संबंधित काही आव्हाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना सतावत आहेत.”
“आता आम्ही कंपनीच्या वेबसाइटवर आमच्या ट्रॅक्टरच्या श्रेणींच्या किंमती दाखविण्यास उत्सुक आहोत. हा एक अद्वितीय निर्णय आहे ज्यामुळे ट्रॅक्टर खरेदी प्रक्रियेमध्ये आणखी पारदर्शकता येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासा बरोबरच जागरुकता देखील वाढेल. तसेच त्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडण्यासही मदत होईल.” Sonalika Tractors
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sonalika.com/tractor
हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या