व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सोनगाव कचरा डेपोला टाळे ठोकणार; ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

सातारा : वैभव (शुभम) बोडके (सातारा प्रतिनिधी) : – साताऱ्यातील कचरा साताऱ्याच्या बाहेर असणाऱ्या सोनगाव कचरा डेपो (Songaon Garbage Depot) जवळ असलेल्या रस्त्यावर फेकला जात असल्याने, तेथे दुर्गंधी अस्वच्छता आणि प्रदूषित पाणी यामुळे होणारा त्रास यावर स्थानिक ग्रामस्थ यांनी आपल्या व्यथा हॅलो महाराष्ट्र वर मांडल्या आहेत. काय म्हणाले चला पाहूया…

पुन्हा एकदा साताऱ्यातील कचरा डेपोचा (Songaon Garbage Depot) प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य वेळी न लावता, बंद असणाऱ्या मशीन मुळे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा होत नसल्याने आणि रस्त्यावर फेकणारा कचरा यामुळे होणारी दुर्गंधी यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच रस्त्यालगत स्ट्रीट लाईट नसल्याने सोनगावच्या ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. जर पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कचरा डेपोला (Songaon Garbage Depot) टाळे ठोकणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.

या सगळ्या त्रासाबद्दल नगरपालिकेला वारंवार तक्रारी निवेदन देऊनदेखील नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. या कचऱ्यामुळे (Songaon Garbage Depot) भटक्या कुत्र्यांचा त्रास, एक्सीडेंटच्या घटना,पाळीव प्राण्यांना होणारे रोग, ओढ्यातून येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे जनावरांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांनाही या सगळ्या दुर्गंधीमुळे आजार होत आहेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन यावर काय भूमिका घेतेय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!