सोनिया गांधी निवृत्त होणार? काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात केलं ‘हे’ सूचक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे,” असे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हंटले. त्यांच्या भाषणातून त्यांनी एक प्रकारे राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनास काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे.

यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, “भारत देश तसेच काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजपा, आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. तसेच या संस्था नेस्तनाबूत केल्या आहेत. काही उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असल्याचे गांधी यांनी म्हंटले.