मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! लवकरच Hotstar आणि Jio सिनेमा एकत्र येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी डिज्नी हॉटस्टार ( Disney Hotstar ) या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची मालकी मिळवली आहे. ते लवकरच हॉटस्टार आणि जिओ सिनेमा याचे एकत्रीकरण करणार असून , हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टार याच नावाने ओळखला जाणार आहे. याआधी दोन्ही प्लॅटफॉर्म्स वेगळे चालवण्याचा विचार होता . पण हॉटस्टारकडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रिलायन्सने हा प्लॅटफॉर्मच कायम स्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिओ सिनेमा हे स्वतंत्र अस्तित्व गमावेल आणि ते डिज्नी हॉटस्टारमध्ये विलीन होईल .

हॉटस्टारला जास्त पसंती

हॉटस्टारकडे लोकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येते. जवळ जवळ हि अँप 50 कोटी लोकांनी डाउनलोड केली असून , त्याचे मासिक वापरकर्ते 33.3 कोटी एवढे आहेत. त्यामध्ये 3.5 कोटी लोकांनी सबस्क्रीप्शन घेऊन सेवांचा आनंद लुटत आहेत . तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या दरम्यान हा आकडा 6.1 कोटी सबस्क्रायबर्सपर्यंत पोहचला होता. हॉटस्टारच्या तुलनेत जिओ सिमेनाचे डाऊनलोड्स फक्त 10 कोटी असून , त्यांच्या मासिक वापरकर्त्यांची संख्या 22.5 कोटी आहे. म्हणजे हॉटस्टारपेक्षा जिओ सिनेमाचे वापरकर्ते कमी आहे , म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज हा निर्णय घेतला आहे.

जिओ सिनेमाचे हॉटस्टारमध्ये विलीन

डिज्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन्हीमधील प्लॅटफॉर्मचा पहिला मंच क्रीडासाठी तर दुसरा मनोरंजनासाठी असेल असा त्यांचा विचार होता , पण तो विचार बदलण्यात आला . आता जिओ सिनेमा हे हॉटस्टारमध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे लोकांना आता नव्या सेवांचा अनुभव घेता येणार आहे . या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या प्लॅटफॉर्मकडे एकूण 100 चॅनेल्स आणि 2 स्ट्रिमिंग सर्व्हिसेस असणार आहेत.