वडापावमध्ये सापडला साबणाचा तुकडा; प्रवाशाच्या तोंडातून आला फेस

soup in vadapav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वडापाव (Vadapav) खाताना त्यात साबणाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना कर्जत रेल्वेस्थानकातील स्टॉलवर घडला आहे. रशिदा घोरी नावाच्या महिलेसोबत हा प्रकार घडला. यंत्र त्यांनी त्वरित सुरक्षा रक्षकाकडे तक्रार केली. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर या महिलेने स्टेशन मास्तर कार्यालयात लेखी तक्रार केल्यानंतर हा स्टॉल तातडीने बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रशिदा घोरी या महिला त्यांच्या दोन मुलांसह मुंबई ते कर्जत प्रवास करत होत्या. मंगळवारी, १ एप्रिलला प्रवासादरम्यान वडापाव खाल्ल्यानंतर डिटर्जंटयुक्त फेस तोंडात आल्यामुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. रशिदा यांच्या मुलांच्या पोटातही दुखू लागलं. म्हणून त्यांनी वडापाव नीट निरखून बघितला असता त्यात साबणाचा तुकडा आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्म नंबर दोनवरील अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते व्ही. के. जैन टी स्टॉल यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यावर व्ही. के. जैन टी स्टॉलधारकाने तक्रारीचे निराकरण न करता तुम्ही आमच्याकडून घेऊन दुसरीकडे तो खाल्ला. त्यामुळे ते आम्ही पाहिले नाही, असे बेजवाबदारपणे उत्तरे दिले. त्यानंतर रशिदा घोरी यांनी कर्जत स्टेशन उप प्रबंधक यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवली.

या तक्रारीची गंभीर दखल घेत कर्जत रेल्वेस्थानकाचे स्टेशन प्रबंधक प्रभासकुमार लाल यांनी हा स्टॉल तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. याबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. या प्रकाराबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची भावना असून, रेल्वे या प्रकाराबाबत काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.रेल्वेस्थानकातील वडापावमध्ये सापडलेला साबणाचा तुकडा हा गंभीर प्रकार आहे. याची त्वरित दखल घेऊन हा स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वरिष्ठांकडे याबाबत सविस्तर माहिती पाठवली असून, वरिष्ठ कार्यालयातून पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे अशी महिती कर्जत रेल्वेस्थानक स्टेशन प्रबंधक, प्रभासकुमार लाल यांनी दिली.