South India Tour Packages : स्वस्तात करा दक्षिण भारताची ट्रिप; IRCTC ने आणलं परवडणारे टूर पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

South India Tour Packages : जानेवारी, फेब्रुवारी महिना म्हणजे पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. हवेत गारठा वाढलेला असतो, वातावरण प्रसन्न असते. भारतात हा मोसम पर्यटन करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पर्यटक जास्त पसंती देतात. त्यातच दक्षिण भारत म्हणजे हिरवाईने नटलेला, डोंगर – दऱ्यांनी बहरलेला, मंदिरे, हॉटेल्स, समुद्रकिनारा असलेले रमणीय क्षेत्र आहे. या दक्षिण भारतात स्वस्तात जाण्याची संधी IRCTC तुम्हाला देत आहे. कारण IRCTC ने दक्षिण भारताची सफर करण्यासाठी प्रवाशांना अगदी परडवेल अशा किमतीत टूर पॅकेज आणलं आहे. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान ही ट्रीप सुरु होत आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

रामेश्वरम आणि कन्याकुमारीसह केरळ असे या IRCTC च्या टूर पॅकेजचे (South India Tour Packages) नाव आहे. या प्रवासात तुम्ही विमानाने प्रवास करू शकणार आहात. तब्बल 7 रात्री आणि 8 दिवसाचा हा एकूण सर्व प्रवास असणार आहे. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी, कोची, कुमारकोम, मदुराई, मुन्नार, रामेश्वरम आणि त्रिवेंद्रम अशा ठिकाणी प्रवास करण्याचा हा प्लान आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप (Trip) फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासची तिकिटे उपलब्ध होणार आहेत. प्रवासादरम्यान राहाण्यासाठी हॉटेल सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि जेवणाची उत्तम सोयही केलेली आहे. तसेच या पॅकेजमध्ये प्रवास विम्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिलेली आहे.

तिकीट किती असेल – South India Tour Packages

तुम्ही सोलो ट्रिप किंवा वैयक्तिक ट्रीप करणार असेल तर 73,150 रुपये खर्च येणार आहे. एका कपल्ससाठी म्हणजे जोडप्यासाठी एका व्यक्तीला 55, 550 रुपये खर्च येईल. 3 व्यक्तींनी ट्रीप बुक केली तर प्रत्येकी 53,850 रुपयांचा खर्च येईल. जर मुलांना घेऊन जायचे तर बेडसाठी 49,350 रुपये खर्च येऊ शकेल आणि बेडशिवाय 43,500 रुपये खर्च येऊ शकतो.

बुकिंग कसे करू शकता ?

दक्षिण भारताच्या या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाटला भेट द्या. आयआरसीटीसीचे पॅकेज ‘रामेश्वरम आणि कन्याकुमारीसह केरळ पॅकेज.’ पहा. यावरून तिकीट बुक करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच IRCTC पर्यटक सुविधा केंद्राच्या कार्यालयातून बुकिंग करणयाची सोय उपलब्ध आहे. या ट्रीपसाठी 1 महिन्याचा अवकाश असला तरी लवकर बुक केल्यास दक्षिण भारताच्या टूरची (South India Tour Packages) खात्री निश्चित आहे.