Mansoon Update| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अखेर 6 जूनपासून महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. होसाळीकर यांनी एक ट्विट केले आहे ज्यात, नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा रत्नागिरी, सोलापूर आणि मेडक, यासह भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहचेल, अशी माहिती दिली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील जनता उष्णतेमुळे हैराण झाली होती. यात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना घराच्या बाहेर पडणे ही मुश्कील करून ठेवले होते. परंतु आता पावसाचे आगमन झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. तसेच, शेतकऱ्यांना आणि राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मधल्या काळात राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. या वातावरणातील बदलानंतर च राज्यात 6 जूनला मान्सूनचे आगमन झाले आहे.
आज आणि उद्या या भागात कोसळणार पाऊस (Mansoon Update)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळेल. यासह दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील पाऊस बरसेल. उद्या म्हणजेच शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल. महत्वाचे म्हणजे, आज मुंबई, पुणे, ठाणे अशा इतर भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये तर गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाच्या सरी बरसत आहेत.
दरम्यान, मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या भागात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिक खराब झाले. यासह इतर भागात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.