Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सरकारकडून नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जात ​​आहे. 19 डिसेंबर 2022 म्हणजेच आजपासून Sovereign Gold Bond 2022-23 च्या तिसऱ्या सिरीजची विक्री सुरू होते आहे. जी फक्त 5 दिवसांसाठी (19 ते 23 डिसेंबर) खुली असेल. यादरम्यान नागरिकांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करता येईल.

सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून Sovereign Gold Bond जारी केले जातात. सॉवरेन गोल्ड बाँड 2022-23 च्या तिसर्‍या सिरीजसाठीची इश्यू प्राईस रुपये 5,409 प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.

SBI Loan against Sovereign Gold Bonds - EMI Calculator

ऑनलाइन खरेदीवर प्रति ग्रॅम मिळेल 50 रुपयांची सूट

हे लक्षात घ्या कि, Sovereign Gold Bond साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी त्यांना ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू प्राईस 5,359 रुपये प्रति ग्रॅम असेल.

sovereign gold bond investments: Can you take a loan against your Sovereign Gold Bond investments? - The Economic Times

Sovereign Gold Bond कसे खरेदी करावे ???

Sovereign Gold Bond ची विक्री शेड्यूल्ड कमर्शिअल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., डेजिग्नेटेड पोस्ट ऑफिसेस, NSE आणि BSE) द्वारे केली जाईल.

Sovereign Gold Bond: आज से मिल रहा है सस्ता सोना खरीदने का मौका, जानें कैसे करें निवेश

किती व्याज मिळेल ???

सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या मॅच्युरिटीचा कालावधी 8 वर्ष आहे. तसेच 5 व्या वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील मिळेल. एका निवेदनानुसार, गुंतवणूकदारांना अर्धवार्षिक आधारावर फेस व्हॅल्यूवर 2.50 टक्के वार्षिक व्याज मिळेल.

सोने को बैंक में जमा करवाकर आप भी कर सकते हैं कमाई, SBI की रिवैम्प्ड गोल्ड डिपॉजिट स्कीम में करें निवेश | gold ; gold deposit scheme ; SBI ; state bank

जास्तीत जास्त किती बॉण्ड्स खरेदी करता येतील ???

या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो आणि कमीत कमी किमान एक ग्रॅमचे गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. त्याच वेळी, ट्रस्ट किंवा त्यासारख्या संस्थांना 20 किलोपर्यंतचे गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://sbi.co.in/web/personal-banking/loans/loans-against-securities/loan-against-sovereign-gold-bond

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या आज झाले बदल, नवीन दर तपासा
Gold Price : सोने खरेदीवर मोठी सवलत !!! मागणी कमी झाल्याने डीलर्स देत आहेत ‘ही’ मोठी ऑफर
OnePlus 10 Pro 5G फोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा
Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​आता FD वर मिळणार जास्त व्याज