Sovereign Gold Bonds Scheme : स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; 23 जूनपर्यंत मिळेल लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याला खूप किंमत आहे. फक्त लग्नसराईताच्या काळातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने सोने खरेदीकडे ग्राहकांचे आकर्षण असते. सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण सोने खरेदीला प्राधान्य देतात. तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bonds Scheme) असं या योजनेचं नाव आहे. आज 19 जूनपासून या योजनेअंतर्गत गुंतवणुकीस सुरुवात होणार असून यामध्ये तुम्ही 23 जूनपर्यंत गुंतवणूक करू शकता

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता. ही स्कीम लोकांना पेपरलेस पद्धतीने सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी चान्स देते. म्हणजेच तुम्ही फिजिकली जाऊन सोने खरेदी न करता, इन्व्हेस्टर्सच्या मार्फत खरेदी करू शकतात. इन्व्हेस्टर्स भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेले बॉण्ड विकत घेतात. हे बॉण्ड सोन्याच्या किमतीच्या संबंधित असतात.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत (Sovereign Gold Bonds Scheme) एक ग्रॅम सोन्याची किंमत लॉन्च केली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे सीरिजसाठी 5,926 रुपये किंमत निश्चित केली आहे. इन्वेस्टर्सने ऑनलाइन पद्धतीने जर पैसे भरले तर त्याला प्रति ग्राम 50 रुपये सूट दिली जाते. यानुसार सोन्याची किंमत 5 हजार 876 एवढी होते. इन्व्हेस्टरला सॉवरेन गोल्ड बॉण्ड वर सहामाही 2.5 टक्के व्याज दिले जाते.

या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 8 वर्षाचा कालावधी असतो. एकदा इन्व्हेस्ट केल्या नंतर तुम्हाला परत पैसे गुंतवण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला बाहेर निघण्याचा पर्याय दिला जातो. यानुसार पाच वर्षानंतर आरबीआय कडून पैसे परत देखील घेता येऊ शकतात.

कोणाला मिळणार लाभ –

सॉवरेन गोल्ड बॉण्ड या योजनेच्या माध्यमातून फक्त भारतीय निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मादाय संस्था यांनाच सोने खरेदी करता येईल. या योजनेमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार एका वर्षात जास्तीत जास्त 4 किलो आणि ट्रस्ट किंवा संस्था एका वर्षात 20 किलोचे रोखे खरेदी करू शकतात.

कोठे करू शकता सोने खरेदी? (Sovereign Gold Bonds Scheme)

1) तुम्ही गोल्ड बाँड बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता
2) गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) द्वारे खरेदी करू शकता.
3) पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे खरेदी करू शकतात.