शेतीमध्ये आजकाल अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. शेतकरी देखील नवनवीन कल्पनांचे स्वागत करत आहेत. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. अशातच आता अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक पेरणीचा नवा प्रयोग केलेला आहे. ते म्हणजे अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ड्रायव्हर शिवाय ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केलेली आहे. या जर्मन तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच केला गेलेला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका सरळ रेषेमध्ये पेरणी होत असते. आणि शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत सोयीस्कर ठरते.
सुरुवातीच्या काळात पेरणी म्हटलं की, खूप गडबड असायची त्यासाठी बैल तीफन त्यामागे पेरणारी माणसं लागायची परंतु आता कृषी क्षेत्रात देखील खूप क्रांती झालेली आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण जग तंत्रज्ञानाने वेढलेले आहे. या तंत्रज्ञानाचा परिणाम शेतीवर देखील झालेला आहे. त्यामुळे अनेक शेती संबंधित यंत्र देखील आलेली आहे. ट्रॅक्टर चालवायला आधी माणूस लागायचा. परंतु आता तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, ड्रायव्हर शिवाय आता ट्रॅक्टर शेतात काम करू लागले आहेत. हे आता ऑटो पायलेट सोईंग टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेले आहे. अकोल्यातील एका कुटुंबीयांनी हा प्रयोग केलेला आहे आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी देखील.
या तंत्रज्ञानाद्वारे अगदी सरळ रेषेत पेरणी होते. आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी चालकाची देखील गरज लागत नाही. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाच्या आर्टिके हे उपकरण लावण्यात आलेले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवले जाते. आणि जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरची जोडले जाते. याबाबतची माहिती इंजिनियर आणि अभ्यासक हांडे यांनी दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे येणाऱ्या काळात या जीपीएस टेक्निकचा वापर करून अनेक शेतकरी याला तंत्रज्ञानाचा वापर करतील अशी भावना व्यक्त केली जात आहे.