Soyabean Rate | सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 5 हजार, धनंजय मुंडेनी केली मोठी घोषणा

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूक आज चालू आहे. आणि या निवडणुकांमध्ये यावर्षी शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे घेतलेला आहे. यावर्षी अनेक पिकांचा भाव वाढत आहे. तर काही पिकांचे भाव घसरलेले आहे. यात आता सोयाबीनच्या पिकाचे दर हे गेल्या काही महिन्यांपासून घसरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगला धरून ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात आणि काँग्रेस सरकारमधील दराची आकडेवारी देखील जाहीर केलेली आहे. अशातच आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. अशातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी जाहीर केलेली आहे.

भाजप पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे अहमदपुर येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी शुभेच्छा शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणा केली होती. निवडणूक काळात आचारसंहिता असल्यामुळे कोणतीही घोषणा करता येत नाही. किंवा मतदारांना आम्ही दाखवून मत मिळवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत नाही. परंतु आता कृषीमंत्र्यांनी घोषणा करून तारीखही जाहीर केलेली आहे.

हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर हेक्टरी 5000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे येत्या 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा देखील होणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी लातूरमधून केलेली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केलेले आहे. या पॅकेज मधूनच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर हेक्टरी पाच हजार रुपये देण्याची देखील घोषणा केलेली आहे.