Soybean Cotton Subsidy | आपले राज्य सरकारन आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आजकाल अनियमित पाऊस अतिवृष्टी अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. आणि तेच नुकसान भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडून विविध योजना आलेले आहेत. अशातच आता खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कपाशी (Soybean Cotton Subsidy ) या पिकांचे नुकसान झालेले आहे. आणि या पिकांसाठी सरकारकडून मदत मिळणार आहे. सरकारकडून हा एक मोठा निर्णय घेतला आहे.आणि ही मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
काय आहे योजना ? | Soybean Cotton Subsidy
गेल्या वर्षी खरीप हंगामात आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांचे सोयाबीन आणि कपाशी हे पीक नष्ट झाल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसलेला आहे. आता याच कठीण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे. आणि सरकार निश्चित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यास निर्णय घेतलेला आहे. सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत मदत सरकारकडून मिळणार आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार ?
ज्या शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगाम सोयाबीन किंवा कपाशी पिके घेतलेली आहेत. त्या शेतकऱ्यांची नावे आता ईपीक पाहणी पोर्टलवर नोंदवलेली आहे. अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांचे क्षेत्र 0.2 हेक्टर पेक्षा कमी आहे. त्यांना 1000 रुपये आणि 0.2 पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 हजार रुपये मदत मिळणार आहे.
मदत कशी मिळणार? | Soybean Cotton Subsidy
शेतकऱ्यांना यासाठी कृषी सहाय्यकाकडे काही कागदपत्रे जमा करावी लागेल. त्यानंतर सरकार तुमच्या संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया करत पडताळणी करत ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या आधार का लिंक खात्यात पैसे जमा केले जाईल. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान 10 सप्टेंबरपर्यंत येणार असल्याची माहिती दिलेली आहे.