Soybean Crop Variety | महाराष्ट्र शेतीतील पिकासाठी आता खरीप हंगाम चालू झालेला आहे. त्यामुळे या हंगामात अनेक लोकही कपाशी आणि सोयाबीन या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजेच खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न या दोन पिकांवर जास्त करून अवलंबून असते. यामध्ये सोयाबीन पिकाची लागवड ही महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे त्या पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी देखील चांगला प्रयत्न करत असतात. सोयाबीनच्या पिकाची चांगली लागवड येण्यासाठी सोयाबीनची वाण देखील चांगले दर्जेदार असावे लागते. (Soybean Crop Variety) जर तुमच्याकडे चांगले दर्जेदार वाण नसेल, तर चांगले व्यवस्थापन करून देखील त्याचा तुम्हाला चांगला फायदा होत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या वाणाची निवड करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
केडीएस 992 फुले दुर्वो | Soybean Crop Variety
सोयाबीनची ही एक विकसित वाण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये हे वाण खूप प्रसिद्ध आहे. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित केलेले आहे. या पिकाच्या लागवडीनंतर सरासरी 110 ते 105 दिवसात हे पीक काढण्यासाठी येते.
सोयाबीनच्या या जातीला जास्त प्रमाणात फांद्या येतात. महत्त्वाचे म्हणजे कीटक व रोगांना खूप प्रमाणात बळी पडणारी ही जात असल्यामुळे शेतकऱ्यांची फवारणीवर बराच खर्च वाचतो. या सोयाबीनचे दाणे टपोरे असतात. आणि वजनदार देखील असतात. त्यामुळे सोयाबीनची ही जात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
ग्रीन गोल्ड 3444 | Soybean Crop Variety
सोयाबीनची ही जात देखील भरघोस उत्पन्न देते. लागवडीनंतर जवळपास 95 ते 100 दिवसांमध्ये हे पीक काढण्यास तयार होते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे याला आंबट आणि लहान आकाराची पाने असल्यामुळे खोडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो. या सोयाबीनच्या पानाला फुलधारणा देखील जास्त प्रमाणात होते. या वाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वाणाच्या 60% शेंगांमध्ये चार जाणे असतात. शेतामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणत पाणी साचून राहते. त्या ठिकाणी हे खराब न होता व्यवस्थित राहते. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी या वाणाची लागवड केली, तर तुम्हाला चांगले उत्पादन होईल.
फुले संगम
सोयाबीनची ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. यालाच केडीएस 726 असे देखील म्हणतात. लागवडीनंतर ही जात साधारणपणे 105 ते 110 दिवसात काढण्यात येते. या वाणाचे दाणे टपोरे असतात. आणि आकर्षक देखील असतात. जर टोकण पद्धतीने तुम्हाला लागवड करायची असेल, तर ही जात उत्कृष्ट आहे. या मनाच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा यलो मोझॅक आणि इतर किडींना लवकर बळी पडतो. तुम्हाला जर हे जात लागवडीसाठी वापरायची असेल, तर त्याचे व्यवस्थापन देखील योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे.