आदित्य ठाकरेंना मुलगी पाहण्यासाठीही पंतप्रधानांना पत्र पाठवतील, चंद्रकांत पाटलांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामधील नेते सतत एकमेकांवर टीका करीत असताना पाहायला मिळतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांना मुलगी पाहायची असेल तर पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील लॉकडाऊन बाबत निर्णय देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी कोरोना आणि 12 च्या परिक्षांबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असं जनतेशी संवाद साधत असताना सांगितलं होतं. या मुद्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्यला लग्नाकरिता मुलगी पाहिजे आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवतील’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

ती भेट राजकीय नाही …

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत देखील पाटील यांनी वक्तव्य केले ते म्हणले, ‘शरद पवार आजारी आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस भेटायला गेले होते. पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी गेले. त्यामध्ये राजकीय काही नव्हतं. त्यानंतर ते जळगावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत’ असंही पाटील म्हणाले.

संभाजीराजेंवरील हेरगिरीचा निषेध

यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले , मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात. लवकरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. पण खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे का? मुळात, महाविकास आघाडी सरकार हे कोडगे सरकार आहे. त्यांची संभाजीराजेंवर हेरगिरी सुरू आहे, त्याचा मी निषेध करतो, असंही पाटील म्हणाले

Leave a Comment