ताडोबा प्रकल्पात मीरा वाघिणीचा मृत्यू; गव्याच्या शिकारीत मृत्यू झाल्याचे उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये माया वाघिणीच्या मीरा या बछड्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास समोर आली. या वाघिणीच्या शरीरावर खोलवर जखमा आढळल्या आहेत. अधिक रक्तस्त्रावामुळे या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मीरा वाघीण दोन वर्षे वयाची होती. शिकारीचे पूर्ण तंत्र तिला अवगत नव्हते. यातच गव्याची शिकार करीत असताना त्याने तिच्यावर प्रतिहल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. गस्ती पथकाला जखमी अवस्थेत ही वाघीण दिसूनही आली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नैसर्गिक संघर्षात जखमी वन्यजीव पकडून औषधोपचार करणे अपेक्षित नाही. तेव्हापासून गस्ती पथकांद्वारे वाघिणीवर लक्ष ठेवण्यात येत होते. शुक्रवारी ही वाघीण गस्ती पथकाच्या नजरेआड झाली.

त्यानंतर सातत्याने दोन पथकाद्वारे शोध घेऊनही वाघीण आढळून आली नाही. ताडोबा नियत क्षेत्रात पंचधाराजवळ सोमवारी सकाळी आठच्या सुमारास गस्ती पथकाला तिचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, माया आणि तिच्या बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून ताडोब्याला येत असत. मात्र सध्या मीराच्या अचानक जाण्याने प्रशासनासाठी आणि पर्यटकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment