New Year निम्मित Jio, Airtel, VI ची रिचार्ज प्लॅन्सवर खास ऑफर; पैशांची होणार बचत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपन्या रिचार्ज प्लान्स वर वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. या ऑफर्स आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच त्याच्यामुळे आपले पैसे देखील वाचू शकतात. सध्या न्यू इयर निमित्त Reliance Jio, Airtel, VI वर प्रीपेड योजना सुरू आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे जाणून..

Reliance Jio

नवीन वर्षानिमित्त रिलायन्स जिओने वर्षाच्या प्रीपेड रिचार्ज वर एक भन्नाट ऑफर आली आहे. तुम्ही जर 2,999 चा वर्षाचा विचार केला तर तुम्हाला जिओ 365 दिवसांची वैधता ऐवजी 389 दिवसांची वैधता मिळेल. थोडक्यात, या रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला एक महिना मोफत मिळेल. 2,999 रिचार्ज प्लॅनमध्ये, दररोज 2.5 GB डेटा 100 SMS आणि JioTV, JioCinema तसेच JioCloud यासह Jio App मिळतील.

Airtel plan

तुम्ही जर एअरटेलचा Rs 3,350 रिचार्ज केला तर त्यात तुम्हाला 365 दिवस वैधता, 2.5 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS मिळतील. तसेच, 5G डेटा व्यतिरिक्त डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल प्लान से एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळेल. यासोबत, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यामुळे तुम्हाला वेगळ्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्चावे लागणार नाही.

VI plan

नव्या वर्षाच्या निमित्ताने तुम्ही जर VI चा 3,099 रिचार्ज केला तर तुम्हाला 365 दिवसांची वैधता, प्रतिदिन 2 GB, दररोज 10 SMS मिळतील. यासोबत, Binge All Night , वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi Movies आणि TV मोफत मिळेल.