लोक तुमचे सांगाती, तुम्ही लोकांचे सांगाती! शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात त्यांची लाडकी लेक म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना खास अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, 

प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.

मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत. कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.

https://www.facebook.com/100044093303263/posts/pfbid0ws77givTPMdnm3vg8qRmCnEJSpf2SaX3heVVHJLSjZ8PFbWUdKRWmJyzRR3SCe7Rl/?app=fbl

मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !