सणासुदीच्या काळात रेल्वेचा मोठा निर्णय!! मुंबई- पुण्याहून सोडणार स्पेशल ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. सणासुदीचा काळ असल्याने अनेकांना या दिवसात सुट्टी असते आणि प्रत्येकाला गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करायला लागू नये, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने (Indian Railways) मुंबई- पुण्याहून स्पेशल ट्रेन (Special train from Mumbai and Pune) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि पुणे येथून  प्रवाश्यांसाठी  नागपूर, पटना, गया  तसेच  अन्य महत्वाच्या शहरांसाठी  विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन  करण्यात आले आहे. या रेल्वेगाड्या कुठून व कशा सोडल्या जातील हे जाणून घेऊयात.

1) मुंबई  – नागपूर फेस्टिवल एक्सप्रेस :

मुंबई  ते नागपूर ही विशेष रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून दोन वेळेस सोडण्यात येईल. मुंबईच्या CSMT स्थानाकातून सुटून नागपूर येथपर्यंत ट्रेन धावणार आहे. या प्रवासादरम्यान, ही ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ या स्थानकात थांबणार  आहे.

2) पुणे – नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस :

पुणे ते नागपूर दरम्यान ही सुपरफास्ट ट्रेन धावनार आहे. त्यामुळे विदर्भात सणासाठी जाणाऱ्यांची सोय होणार आहे. ही ट्रेन शुक्रवारी पुणे स्थानाकातून सोडण्यात येणार आहे. जी की आपल्या प्रवासात मनमाड, धामणगाव , बडनेरा, वर्धा ह्या मुख्य स्थानकात थांबणार आहे.

3) दिल्ली ते पटना एक्सप्रेस :

भारतीय रेल्वे दिल्ली ते पाटणा आणि गयापर्यंत सेवा सुरू करत आहे.  पाटणा ते आनंद विहार स्थानक, दिल्ली ही सुपरफास्ट एक्स्प्रेस गुरुवार आणि रविवारी धावेल. याव्यतिरिक्त, दुसरी सुपरफास्ट ट्रेन पटना येथून दर शनिवारी धावेल, रविवारी दिल्लीला पोहोचेल.