उपलब्ध गाड्यांचे आरक्षण फुल्ल ! दिल्लीसाठी धावणार विशेष रेल्वे

delhi train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजधानी दिल्ली हे महत्त्वाचे शहर असून देशभरातून अनेक लोक इथं कामानिमित्त येत असतात. दिल्ली गाठण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून रेल्वे कडे पाहिलं जाते. रेल्वेने दिल्लीपर्यंतचा प्रवास अनेक लोक करतात. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंतचा प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे कडून दिल्लीला जाण्यासाठी 16 ,17 आणि 20 या तीन दिवशी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी १६ आणि १७ रोजी जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुटल्या आहेत मात्र अजूनही तुम्ही रेल्वेने दिल्लीला जाऊ इच्छित असाल तर २० तारखेच्या गाडीने तुम्ही प्रवास करू शकता.

महत्वाची बाब म्हणजे या गाड्या मिरज मार्गे जाणार असल्यामुळे उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना ट्रेन उपलब्ध झाली आहे. सांगली रेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे. दिनांक १८ रोजी सकाळी साडेदहा वाजता मिरज येथून मैसूर- निजामुद्दीन गाडी सुटणार आहे आणि सायंकाळी चार वाजून 25 वाजता ही गाडी पुणे येथून सोडणार आहे तर 19 रोजी रात्री अकरा वाजता निजामुद्दीन इथे पोहोचणार आहे

काय आहे वेळापत्रक ?

गाडी क्रमांक 0725 हुबळी निजामुद्दीन विशेष एक्सप्रेस ही गाडी दिनांक 20 रोजी रात्री नऊ वाजून 45 मिनिटांनी हुबळी इथून सुटेल दिनांक 21 रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी मिरज इथून व सकाळी आठ वाजून 45 वाजता पुणे इथून सोडणार आहे दिनांक 22 रोजी सकाळी साडेअकरा वाजता निजामुद्दीन इथं ही गाडी पोहोचणार आहे.

दोन गाड्या सांगलीत थांबणार

गाडी क्रमांक 0 6 2 1 5 म्हैसूर निजामुद्दीन व गाडी क्रमांक 06 585 या दोन्ही गाड्या अनुक्रमे 17 आणि 18 सप्टेंबरला सकाळी 11:45 वाजता सांगली स्थानकावर येणार आहेत व या दोन्ही गाड्यांची तिकीट उपलब्ध करण्यात आली आहेत

याबाबत माहिती देताना सांगली रेल्वे सल्लागार समितीचे उमेश शहा यांनी सांगितले की दिल्लीकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला असून सांगली शहर व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगलीतून पुढील प्रवासाचे बुकिंग करावे. तर मध्य रेल्वेचे क्षत्रिय सल्लागार सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले की, सध्या दिल्लीला नियमित जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा आरक्षण फुल आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटाची वाट पहावी लागणार नाही रेल्वेची आरक्षित कन्फर्म तिकिटे उपलब्ध असल्याने विशेष रेल्वे गाड्यांचा कोल्हापूर मिरज सांगली प्रवाशांनी लाभ घ्यावा.