Spicejet ची स्पेशल ऑफर! फक्त 1,515 रुपयांमध्ये करता येणार विमानाने प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी स्पाइसजेटने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला कमी किमतीत विमानाचा प्रवास करता येणार आहे. स्पाइसजेट कंपनीने आपल्या प्रवाशांना 1,515 रुपयांमध्ये विमानाचा प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. स्पाइसजेटची ही ऑफर 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या स्पेशल ऑफर्सची घोषणा कंपनीनं स्पेशल इनक्रेडिबल इंडिपेंडन्स डे सेल अंतर्गत केली आहे. त्यामुळे ग्राहकांना फक्त 1,515 मध्ये स्पाइसजेटने प्रवास करता येणार आहे.

ऑफर काय आहे?

स्पाइसजेटकडून देण्यात आलेल्या ऑफरमध्ये, ग्राहकांना 1,515 रुपयांच्या फ्लाइट तिकिट मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना, स्पाइसजेट 2 हजार रुपयांपर्यंतचे मोफत फ्लाइट व्हाउचर देत आहे. तसेच, एअरलाइन कंपनी पसंतीचे सीट निवडण्याची संधी देत आहे. येत्या 20 ऑगस्टपर्यंत ग्राहकांना या संधीचा फायदा घेता येऊ शकतो. ज्यांना ऑफर्स चा लाभ घ्यायचा आहे ते कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तसेच एअर इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.

कुठे जाण्याची संधी मिळणार?

स्पाइसजेटच्या 1,515 रुपयांच्या फ्लाइट तिकिटमध्ये आपण मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी -बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद अशा सर्व ठिकाणी जाऊ शकतो. 1,515 रुपयांच्या या ऑफरमध्ये आपल्याला या सर्व ठिकाणी जाता येऊ शकते. ही ऑफर फक्त देशांतर्गत बुकिंगवर आहे. या ऑफरमध्ये जो व्यक्ती सर्वात प्रथम बुकिंग करेल त्याला स्पेशल सीट अवेलेबल करून देण्यात येईल. परंतु हा फायदा ग्रुप बुकिंगमध्ये कंपनी देणार नाही. किंवा कोणत्याही ऑफरमध्ये त्याला जोडता येऊ शकणार नाही. त्यामुळे फक्त सिंगल व्यक्ती या ऑफरचा लाभ घेऊ शकतो.