Spicejet देणार 1400 कर्मचाऱ्यांना नारळ; आर्थिक संकटामुळे घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन्स क्षेत्रामध्ये स्पाइसजेट (Spicejet) कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. परंतु याच कंपनीने आपल्या 1400 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 15 पंधरा टक्के कर्मचारी स्पाइसजेटमधून बाहेर पडणार आहेत. मुख्य म्हणजे, आर्थिक संकटात गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला एअरलाइनअंतर्गत 30 विमाने कार्यरत आहेत. तर कंपनीमध्ये 9000 कर्मचारी सेवेत आहेत.

कंपनीकडून पगाराला विलंब (Spicejet)

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून स्पाइसजेट कंपनीने (Spicejet) आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार केलेला नाही. कंपनी दरमहा सर्व कर्मचाऱ्यांना 60 कोटी रुपये पगार देत असते. हा 60 कोटी रुपयांचा बोजा उचलत नसल्यामुळे आता कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून टाकण्यासाठी पाऊल चालले आहे. तर दुसऱ्या बाजूला कंपनी गुंतवणूकदारांकडून 2200 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याच्या मार्गावर आहे. कंपनी गुंतवणूकदारांचे हित जपत सर्व योजना मार्गी लावण्याची प्रयत्न करत आहे.

यापूर्वी स्पाइसजेटकडे 2019 साली 118 विमाने आणि 16 हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. परंतु आर्थिक संकट कंपनीला झालेला तोटा अशा अनेक कारणांमुळे या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत गेली. आता कंपनीमध्ये फक्त 9000 कर्मचारी उरलेले आहेत यातील 15 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढून टाकत आहे. त्यामुळे आता याचा देखील मोठा फटका कंपनीला बसू शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, स्पाइसजेटने (Spicejet) अशा काळात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यावेळी इतर कंपन्या देखील कर्मचाऱ्यांना कामावरून टाकण्याच्या तयारीत आहेत. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सिस्को अशा कंपन्यांनी गेल्या वर्षीच कंपनीमधून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.