सावधान ! चटपटीत मसालेदार जेवणामुळे होईल कॅन्सर, जाणून घ्या डॉक्टरांचे मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Health Tips : अनेकजण चटपटीत किंवा जास्त प्रमाणात तिखट असणाऱ्या भाज्या खात असतात. अशा वेळी तुमची ही आवड तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. कारण जर तुम्ही दररोज चटपटीत मसालेदार जेवण केले तर तुम्ही पोटाच्या कॅन्सरचे शिकार व्हाल. कारण पोट किंवा जठरासंबंधी कर्करोग पोटाच्या अस्तर असलेल्या पेशींमध्ये सुरू होतो आणि संपूर्ण पोटात पसरतो.

कॅन्सर हा सर्वात भयंकर आजार आहे. यामध्ये पोटाचा कर्करोग देखील जगभरात कर्करोगाच्या मृत्यूचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार, पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये आहार पद्धतीमुळे पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये दारूबरोबरच मसालेदार पदार्थ खाल्य्यामुळे हा आजार तुम्हाला होऊ शकतो.

मसालेदार पदार्थांमुळे कर्करोग कसा होतो?

महिलांच्या तुलनेत पुरुषांना खाण्यापिण्याच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागत आहे. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने जीवनशैलीतील घटकांमुळे पुरुषांना जास्त धोका असतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, मसालेदार पदार्थ आणि कोलन कॅन्सरचा वाढता धोका यांच्यात मजबूत संबंध आहे. मीठ, मासे, ग्रील्ड मीट आणि भाज्या किंवा कोळशाने शिजवलेले मांस यासारख्या पदार्थांचे सेवन हे अनेक लोकांमध्ये पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याचे मुख्य कारण मानले जाते.

कॅन्सरच नाही तर ट्यूमरचाही धोका

इतकेच नाही तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे लाल मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे अनेक खाद्यपदार्थांच्या मसालेदार चवीसाठी जबाबदार आहे. हे पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकते आणि पोटातील ऍसिडचे उत्पादन वाढवू शकते. अशा पदार्थांच्या नियमित सेवनाने जळजळ होऊ शकते आणि पोटाच्या अस्तरांना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर यावर उपचार केले नाहीत तर ते ट्यूमर बनू शकते आणि तुमच्या पोटाच्या भिंतींमध्ये खोलवर वाढू शकते. ट्यूमर जवळच्या अवयवांमध्ये पसरू शकतो जसे की तुमचे यकृत आणि स्वादुपिंड. अशा प्रकारे तुम्ही पोटाच्या कॅन्सरची काय काय लक्षणे आहेत हे तुम्ही जाणून घ्या.

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घ्या

– भूक न लागणे
– गिळताना त्रास
– थकलेले राहणे
– मळमळ
– वजन कमी होणे
– सतत छातीत जळजळ
– अपचन
– रक्ताच्या उलट्या
– फुगलेला आणि बद्धकोष्ठता जाणवणे
– तीव्र पोटदुखी
– थोडेसे अन्न खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटते