Splendor Plus XTEC 2.0 : नव्या अवतारात लाँच झाली Hero Splendor; देतेय 73 KM मायलेज

Splendor Plus XTEC 2.0 launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero Splendor हि भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक आहे. अनेक घराघरात स्प्लेंडर बघायला मिळते. आता बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार Hero MotoCorp ने अपडेटेड फिंचर्ससह नव्या अवतारात हिरो स्प्लेंडर लाँच केली आहे. Splendor Plus XTEC 2.0 असं या नव्या बाईकचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत, तसेच गाडीच्या लूकमध्ये थोडाफार कॉस्मेटिक बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे हिरो ची नवी स्प्लेंडर तब्बल 73 KM मायलेज देते.

बाईकच्या लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने पूर्वीप्रमाणेच क्लासिक डिझाइन दिले आहे. यामध्ये नवीन एलईडी हेडलाईट व्यतिरिक्त त्यात हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL) बसवण्यात आला आहे. बाईकला देण्यात आलेला अनोखा ‘H’ आकाराचा टेल लॅम्प रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकारे उठून दिसतो. पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, लांब सीट, मोठा ग्लॉव बॉक्स आणि यूएसबी चार्जिंग पोर्टने बाईक सुसज्ज आहे. इतर गाड्यांपेक्षा आपली बाईक उजळून दिसावी यासाठी स्टिल्थी ड्युअल-टोन कलर स्कीम देण्यात आली आहे. तुम्ही तुमचा स्मार्टफोन या बाईकशी कनेक्ट करू शकता, जेणेकरून सायकल चालवताना तुम्हाला एसएमएस, कॉल आणि बॅटरी अलर्ट मिळतील.

इंजिन – Splendor Plus XTEC 2.0

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, Hero Splendor ला पॉवर करण्यासाठी, नियमित मॉडेलप्रमाणे एअर-कूल्ड, 97.2cc, स्लोपर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून 8,000rpm वर 8.02 hp पॉवर आणि 6,000rpm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करते. हे आयडियल स्टार्ट/स्टॉक सिस्टम (i3S) ने सुसज्ज आहे. जे बाईकचे मायलेज सुधारण्यास मदत करते. कंपनीचा दावा आहे कि १ लिटर पेट्रोलमध्ये हिरो ची नवी स्प्लेंडर ७३ किलोमीटर अंतर सहज पार करेल.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे बाईकच्या किमतीचा, तर Splendor Plus XTEC 2.0 ची किंमत 82,911 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. भारतीय बाजारात हि बाईक Honda Shine 100 आणि Bajaj Platina 100 ला तगडी टक्कर देईल.