SPPU Pune | पुणे विद्यापीठाच्या 2024 पदवी प्रमाणपत्र सोहळ्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SPPU Pune | आपल्या आयुष्यात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण शिकलो तर घडतो आणि समाजातील इतर अनेक गोष्टींची देखील आपल्याला जाणीव होते. या शिक्षणाच्या टप्प्यांमध्ये पदवीधर होणे ही आपल्यासाठी एक खूप मोठी गोष्ट असते. अशीच नुकतेच 2023 मध्ये पदवी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन येत आहोत. कारण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक महत्त्वाची अपडेट झालेली जारी झालेली आहे. या अपडेटनुसार आता विद्यापीठाच्या वतीने पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा मे ते जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. विद्यापीठाची (SPPU Pune) पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे याची सविस्तर माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

अर्ज कुठे करायचा? | SPPU Pune

ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर 2023 मध्ये जे विद्यार्थी पदवी उत्तीर्ण झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता तुम्ही हा अर्ज करा. त्याचप्रमाणे 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. म्हणजेच तुम्ही 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकत असला तरी 30 मार्चनंतर तुमची अर्ज करण्याची शुल्क वाढणार आहे.

कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?

  • ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2023 मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तेच विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • या अर्जाचा नमुना तसेच शुल्क संबंध सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला देण्यात आलेली आहे.
  • पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असले तरी योग्य शुल्कासह भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेवटच्या वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत अपलोड करणे देखील गरजेचे आहे.
  • अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाने दिलेली आहे.
  • त्यामुळे आता तुम्ही कोणताही विलंब न करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.