SPPU Recruitment 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन संधी आलेली आहे. ती म्हणजे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबंधक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्ही जर अर्ज करणार असाल तर 23 फेब्रुवारी 2024 ही आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना 4 मार्च 2024 पर्यंत अर्जाची प्रत जमा करण्याची मुभा देखील दिलेली आहे.
पदाचे नाव-
पुणे विद्यापीठातील प्रबंधक पदाच्यासाठी या जागा भरल्या जाणार आहेत
शैक्षणिक पात्रता
विद्यापीठाच्या किमान 55 गुणांसह पदवी तर किंवा पदवी असावी.
त्याचप्रमाणे मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये प्राविण्य असावे.
पगार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रजिस्टर या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला 1 लाख 31 हजार ते 2 लाख 16 हजार 600 एवढा पगार दिला जाणार आहे हा पगार सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत | SPPU Recruitment 2024
हे भरतीचे अर्ज ऑनलाईन इमेलच्या माध्यमातून सादर करायचे आहेत.
त्याचप्रमाणे तुम्ही पुणे विद्यापीठातील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून देखील हे अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेतली जाईल
- पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला हजर राहावे.