Sri Krishna Janmashtami : महाराष्ट्रातील ‘या’ 5 दहीहंडी उत्सवांमध्ये मिळते एक कोटीपर्यंतचे बक्षीस !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Sri Krishna Janmashtami : दहीहंडीच्या सणासाठी आता अवघे 2 दिवसच उरले आहे. त्यादृष्टीने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दहीहंडीकडे लोकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी मंडळांच्या आयोजकांकडून सर्व तयारी करण्यात येत आहे. हे लक्षात घ्या कि, कोरोनामुळे गेली 2 वर्षे कोणलाही दहीहंडीचे आयोजन करता आलेले नाही.

Krishna Janmashtami : One Person Killed And 121 Injured In On Dahi Handi  Festival In Mumbai - मुंबई में दही हांडी उत्सव में एक व्यक्ति की मौत, 121  घायल - Amar Ujala Hindi News Live

महाराष्ट्राचा दहीहंडी उत्सवही खूप लोकप्रिय आहे कारण इथे हंडी फोडणाऱ्या संघाला लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोणी आणि दह्याने भरलेली हंडी उंच तारेवर टांगली जाते. त्यानंतर गोविंदांचा ग्रुप एकावर एक मनोरे तयार करून ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यानिमित्ताने मोठी मंडळांकडून कोटींची बक्षिसे देखील ठेवली जातात. जो संघ हंडी फोडण्यात यशस्वी होतो त्याला विजेता घोषित करून बक्षिसाची रक्कम दिली जाते. चला तर मग आज आपण मुंबईच्या 5 अशा मोठ्या दहीहंडीं बाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी देखील सहभागी होतात.  Sri Krishna Janmashtami

संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी यंदाही रद्द; 'आरोग्य उत्सव' साजरा होणार! -  Marathi News | Sanskriti Pratishthan's Dahihandi canceled again this year;  'Health Festival' to be celebrated! | Latest ...

1. संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीने गेल्या काही वर्षांत एक चांगली प्रतिष्ठा तयार केली आहे. 2012 मध्ये जय जवान गोविंदा मंडळाने येथे 43.79 फूट आणि 9 थरांचा मानवी मनोरा बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. तेव्हापासूनच दरवर्षी येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी बॉलीवूड आणि राजकीय जगतातील अनेक सेलिब्रिटी येथे येतात. ठाणे जिल्ह्यातील वर्तक नगर भागातील महापालिकेच्या शाळेत याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत येथील पुरस्काराची रक्कमही एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. यावेळी प्रताप सरनाईक यांनी 21 लाखांचे बक्षीस ठेवले आहे.  Sri Krishna Janmashtami

ठाण्यातच साजरा केल्या जाणाऱ्या आणखी एका दहीहंडी उत्सवात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडून यावेळी 21 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

Pro-Govinda 2022, संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून यंदा 'प्रो-गोविंदा' -  'pro-govinda' this year from sanskriti yuva foundation - Maharashtra Times

2. मागाठाणे दहीहंडी, मालाड

शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दरवर्षी मालाड येथे दहीहंडीचे आयोजन केले जाते. ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईभरातून गोविंदांची अनेक पथके येथे येतात. येथे दरवर्षी लाखोंची बक्षिसेही ठेवली जातात. गेल्या महोत्सवात येथे 11 लाखांचे बक्षीस देण्यात आले होते. इथेही टीव्ही आणि बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात.  Sri Krishna Janmashtami

स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांचा तो मोबाइल नंबर 'अनअॅव्हेलेबल' |  Loksatta

3. राम कदम दहीहंडी, घाटकोपर

भाजपचे आमदार सलेले राम कदम यांच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमात दरवर्षी मुंबईभरातून गोविंदाच पथके येतात. घाटकोपरच्या सॅनेटोरियम लेनमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या दहीहंडीसाठी मोठी गर्दी जमते. कारण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सेलिब्रिटी सहभागी होतात. येथील पुरस्काराची रक्कमही आता 11 लाख रुपयांवरून 51 लाख रुपयांवर आली आहे. यावेळी इथे 21 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.  Sri Krishna Janmashtami

5 must visit popular Dahi Handi events in Mumbai

4. श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ, खारघर

खारघर येथील श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळाकडून आयोजित केली जाणारी ही मुंबईतील लोकप्रिय दहीहंडीपैकी एक आहे. ही दहीहंडी फोडणे अवघड मानले जाते. अनेकदा पथके येथील हंडी न फोडता गोविंदांना रिकाम्या हाताने परतावे लागते. गेल्या काही वर्षांत येथील बक्षिसाची रक्कमही 11 लाखांवर पोहोचली आहे.  Sri Krishna Janmashtami

Krishna Janmashtami 2017: Know the significance of Dahi Handi - Oneindia  News

5. दादर छबिलदास लेन हंडी, दादर

मुंबईतील दादर परिसरात साजरा केला जाणारा हा दहीहंडी उत्सव सर्वात मोठा दहीहंडी उत्सव मानला जातो. इथे फक्त मुलेच नाही तर मुलींची गोविंदा पथके देखील दहीहंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. जे पाहण्यासाठी हजारो लोकं जमतात. आतापर्यंत येथे 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.  Sri Krishna Janmashtami

The playful history behind the Dahi Handi celebrations! – Ample Missiion

हे लक्षात घ्या कि, दहीहंडी उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश लहान मुलांना कृष्णाची करमणूक दाखवणे हा आहे. बाळ गोपाळांना लोणी आणि दही खूप आवडते. कृष्ण अनेकदा आपल्या मित्रांसह घरातून लोणी चोरत असे, त्यामुळे गोपी त्याला उंचावर टांगत असत. यानंतर बालगोपाल आपल्या पथकासह साखळी करून लोणी चोरत असे, तेव्हापासून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की दहीहंडी उत्सव साजरा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.  Sri Krishna Janmashtami

हे पण वाचा :

ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!

Milk Price : देशाच्या इतर भागांच्या तुलनेत ‘या’ शहरामध्ये कमी दराने मिळते दूध !!!

Railway कडून आज 142 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे लिस्ट पहा

Aadhar Card द्वारे सरकार देणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज !!! मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Rakesh Jhunjhunwala यांना कोणत्या शेअर्समुळे नफा अन् नुकसान झाले ते पहा !!!