Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण यांना वडिलांचा मतदारसंघ वाचवणं सध्यातरी जड दिसतंय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाणांनी (Ashok chavan) अखेर काँग्रेस सोडली… भाजपात गेले.. राज्यसभेवर खासदारही झाले… पण या निमित्ताने चर्चा झाली ती त्यांच्या भविष्यातील राजकीय वारसदाराची… जिल्ह्यातल्या ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांच्या राजकारणाचा बेस पक्का झाला… आमदार, खासदार ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला त्या भोकरमधून सध्या ते त्यांच्या मुलीला म्हणजेच श्रिजया चव्हाण (Shrijaya Chavan) हिला लॉन्च करू पाहतायत… पण चव्हाणांनी पक्ष बदललाय… पक्ष संघटनाही फुटलीय… त्यामुळे या नाराजीचा त्यांना बसणारा संभाव्य फटका पाहता नेहमीप्रमाणे यंदाही त्यांच्या मुलीला घसघशीत लीड मिळेल… असं म्हणणं थोडसं धाडसाचंच ठरेल… पण जर काँग्रेसने खेळी करत तोडीस तोड उमेदवार दिला, तर चव्हाणांच्या मुलीचा राजकारणातील पदार्पणातच मोठा पराभव होऊ शकतो… श्रिजया चव्हाण यांना म्हणजेच पर्यायानं अशोक चव्हाणांना मात्र येणाऱ्या विधानसभेला शिंगावर घेण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षातील काही इच्छुकांनी राबवलाय… त्यांनी भावी आमदार म्हणून आपले पोस्टर्स आधीपासूनच मतदारसंघात झळकवायला सुरुवात केलीय… अर्थात यामुळे चव्हाण यांची चांगलीच झोप उडालीय… त्यामुळे स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातच चव्हाणांना आपल्या मुलीला आमदार बनवता येईल का? चव्हाणांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालवू पाहणाऱ्या श्रीजया चव्हाण यांचा पराभव खरच होऊ शकतो का? आणि झालाच तर तो चेहरा नेमका कोण असेल? त्याचंच हे राजकीय विश्लेषण…

अशोक चव्हाण आणि त्यांचा भोकर विधानसभा मतदारसंघ हे समिकरण न भेदता येणारं असं… अनेकांनी प्रयत्न केले… लढती दिल्या पण विजय हा चव्हणानांचाच होयचा… त्यातही प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लीड कितीचं येईल याच्यावर मतदार संघातल्या गप्पा चालायच्या… 2009 ला तर त्यांनी 1 लाख 20 हजारांहून जास्तीचं लीड मिळवत दणक्यात विजय पदरात पाडून घेतला होता… 2014 ला ते लोकसभेवर गेल्याने त्यांनी भोकरमधून त्यांच्या पत्नी अमित चव्हाण यांनी आमदारकीला निवडून दिलं होतं पण त्यांचं मताधिक्य 20 हजारांनी घटलं होतं… पुढे 2019 ला लोकसभेला पराभव नशिबी आलेल्या चव्हाणांनी पुन्हा भोकर विधानसभेकडे मोर्चा वळवला… भाजपच्या बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव करत त्यांनी एक लाखाहून अधिकच्या लिडनं लगेचच लोकसभेच्या पराभवाची सल भरून काढत दणदणीत विजय मिळवला होता… पण अनेक दिवसांपासून ते भाजपाला जाणार असल्याच्या बातम्यांना फुटलेलं पेव आणि रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला… इतकंच काय तर भाजपकडून राज्यसभेची खासदारकीही पदरात पाडून घेतली… अर्थात यातून हे क्लिअर होतं की येणाऱ्या विधानसभेला भोकरमधून त्यांची मुलगी श्रिजया चव्हाण हिला राजकरणात आणण्यासाठी घेतलेलं हे पाऊल होतं…

YouTube video player

सध्या श्रिजया यांचा पायाला भिंगरी लागल्यासारखा सुरू असणारा दौरा आणि गाठीभेटी असता सध्या त्याच महायुतीकडून विधानसभेच्या मैदानात दिसतील, याचे चान्सेस आहेत… पण चव्हाण कुटुंबातील पहिलाच उमेदवार भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरणार असल्यानं आणि त्यातही चेहरा नवखा असल्यानं यंदा पहिल्यांदाच भोकरमध्ये चव्हाणांचा बुरुज ढासळण्याची शक्यता आहे… अर्थात यासाठी मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवारांनी श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी चांगलंच रान तापवलय…

त्यापैकी पहिलं नाव येतं ते बालाजी गाढे पाटील यांचं… सध्या नांदेड जिल्ह्याच्या युवक काँग्रेसची जबाबदारी सांभाळणाऱ्या गाढे पाटलांनी मागील दोन महिन्यांपासूनच प्रचाराचं रणशिंग फुंकलंय… गाव तिथं शाखा घर तिथे कार्यकर्ता पासून ते गावदौरे, शासन प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं आणि मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केलीय… अशोक चव्हाणांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील गलथान कारभार, भ्रष्टाचार, रस्ते – वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर गाढे पाटलांनी चांगलंच रान तापवलय… सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाषण कौशल्यानं त्यांनी चव्हाणांची केलेली अडचण पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय… युवा नेतृत्व, उत्तम संभाषण आणि संघटन कौशल्य, चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला भिडण्याची ताकद असल्यानं त्यांच्या नावाचा विचार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून होऊ शकतो…. यंदा आपल्याला तिकीट कन्फर्म आहेच असं गृहीत धरून सध्या प्रचारात आघाडी मिळवलेल्या गाढे पाटलांनी तिकीट जरी नाकारलं तरी अपक्ष लढत देण्याचा निर्णय घेतल्यानं श्रीजया चव्हाण यांना ते कितपत आणि कशी लढत देतील? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल..

दुसरं नाव येतं ते बी. आर. कदम यांचं…

अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर लागलीच बी. आर. कदम यांची काँग्रेस हाय कमांकडून जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली… त्यांच्याही आमदार होण्याच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेल्या नाहीयेत… सध्या ते उत्तर आणि भोकर मतदार संघासाठी इच्छुक आहेत… अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद हाती आल्यानं राजकारणात तयार झालेला स्पेस ते हळूहळू भरून काढू पाहतायेत… मतदारसंघातील गाठीभेटी आणि पक्ष उभारणीवर त्यांनी विशेष भर दिल्यानं त्यांचा भोकर साठी विचार होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल…यातलं तिसरं नाव येतं ते बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचं…रावणगावकर सध्या मार्केट कमिटी आणि जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आहेत… वेगवेगळ्या राजकीय पदांचा अनुभव आणि हक्काची वोट बँक असल्याने बाळासाहेब पाटलांनीही विधानसभेसाठी दंड थोपाटले आहेत… मतदारसंघातील सिंचनाची रखडलेली काम पूर्ण करण्याच्या हेतूने आणि विकासाचा अजेंडा पुढे करत ते येणाऱ्या काळात विधानसभेत निवडणुकीसाठी उतरू पाहतायत… यासाठी राजकीय गणित जमवायला त्यांनी सुरुवातही केली आहे…

आता यातले शेवटचं नाव पाहुयात ते प्रकाश भोसीकर यांचं… सरपंच ते झेडपी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे… जिल्ह्यात नात्यागोत्यांचं जाळं आणि प्रस्थापित राजकारणात जम असल्याने गेली वर्षभरापासून ते भोकर मधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत… अर्थात आता त्यांच्या प्रयत्नांना उमेदवारी रुपी यश मिळेल का? हे पहावं लागेल…त्यामुळे घराणेशाहीचा शिक्का, बदललेली पक्षनिष्ठा, लोकसभेला बसलेला धक्का, विधानसभेला बदलला जाणारा संभाव्य चेहरा या सगळ्यांमुळे अशोक चव्हाण यांची कन्या श्रिजया चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचं घोडे मैदान सध्या हार्ड आहे… त्यात काँग्रेसकडून इच्छुकांनी यंदा चव्हाणांचा बालेकिल्ला पाडायचाच… पण तो काँग्रेसकडेच राहू द्यायचा… अशी जणू शपथ घेतल्यासारखी भोकर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची तयारी केल्यामुळे आता यात काँग्रेसकडून उमेदवारी मिळून कोण भोकरमध्ये जायंट किलर ठरतोय? याबद्दल तुमचं काय मत आहे? अशोक चव्हाण यांचा परमनंट मतदारसंघ म्हणून ओळख असणारा भोकर विधानसभा श्रिजया चव्हाण यांच्या रूपाने पुढच्या पिढीकडे सरकु शकतो का? महाविकास आघाडीच्या ताकदीवर स्वार होत चव्हाणांना पराभवाचा दणका देणारा काँग्रेसचा उमेदवार कोण? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…