हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य राखीव दल पोलीस विभागाअंतर्गत (SRPF Recruitment 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी निघालेली आहे. या भरतीसाठी एकूण 4800 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 5 मार्च 2024 रोजी ही भरती सुरू झालेली आहे, तर 15 एप्रिल 2024 रोजी ही भरती प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळे 15 एप्रिल आधीच तुम्ही अर्ज करणे गरजेचे आहे.
महत्त्वाची माहिती | SRPF Recruitment 2024
- पदाचे नाव – सशस्त्र शिपाई पोलीस
- एकूण रिक्त जागा – 4800
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024.
महत्त्वाची कागदपत्रे | SRPF Recruitment 2024
- दहावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र
- बारावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- ड्रायव्हिंग लायसन
- वय अधिवास प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र
- खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र
- अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट साईजचे पाच फोटो
- नावात बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत
परीक्षा पद्धत
- सगळ्यात आधी 100 गुणांची मैदानी परीक्षा होईल
- त्यानंतर 1:10 या प्रमाणात विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
- लेखी आणि मैदानी परीक्षेतील गुणांची बेरीज करून शेवटचा निकाल घोषित केला जाईल.
- मैदानी परिषद 50 गुण मिळवणे गरजेचे आहे.
- लेखी परीक्षेत 40 गुण मिळवणे गरजेचे आहे
मैदानी चाचणीची रूपरेषा
पाच किलोमीटर धावणे – 50 गुण
100 मीटर धावणे – 25 गुण
गोळा फेक – 25 गुण