SSC CHSL Bharti 2024 | 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3712 पदांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेक विद्यार्थ्यांची अगदी शाळेपासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते.आणि ते सरकारी नोकरीची तयारी देखील करत असतात. तुम्ही देखील सरकारी नोकरीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (SSC CHSL Bharti 2024) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या अधिक वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया 3712 पदांसाठी केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया ८ एप्रिल 2024 पासून सुरू झालेली आहे, तर 7 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी लवकरच लवकर अर्ज करा. आता या भरती बाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | SSC CHSL Bharti 2024

निम्न विभागीय लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत (SSC CHSL Bharti 2024) तब्बल 3712 पदांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

केवळ 18 ते 27 या दरम्यान वय असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

या भरती अंतर्गत महिला, एसी, एसटी , EWS उमेदवारांना शुल्क माफ केले आहे, तर इतर उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2024

शैक्षणिक पात्रता

निम्न विभागीय लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास असणे गरजेचे आहे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा सायन्स विभागातून मॅथेमॅटिक्स या विषयामधून बारावी पास असला पाहिजे.

वेतन श्रेणी

निम्न विभागीय लिपिक किंवा कनिष्ठ सचिवाले सहाय्यक -19,900 ते 63, 2000 रुपये
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 25052 ते 81,000 रुपये

निवड प्रक्रिया

केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी एक लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर तुमची स्किल तपासणी होईल. नंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. आणि त्यानंतर तुमची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या सगळ्यात पास झाल्यानंतरच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा