पुणे- बंगलोर महामार्गावर ST बस आणि ट्रकची भीषण धडक; 2 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे बंगलोर महामार्गावर कराड तालुक्याच्या वराडे गावच्या हद्दीत रस्त्याकडे उभे असणाऱ्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

नाशिक ते सांगली असा प्रवास करणारी ही एसटी होती. रात्री दहा वाजता वराडे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने वराडे येथील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एसटी बस मध्ये प्रवासी अडकले होते. या अपघातात एसटी कंडक्टर व एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान हा अपघात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर होऊनही पोलीस घटनास्थळी उशीर पर्यंत दाखल झाले नव्हते त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. तेराहील स्थानिक नागरिकांनीचबसमधील जखमी व इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. नाशिक ते सांगली असा प्रवास करणारी ही एसटी असून अपघातातील जखमींचा नेमका आकडा समजू शकला नाही.