ST महामंडळाने 18 टक्के भाडेवाढ करण्याचा केला प्रस्ताव; नवे सरकार काय निर्णय घेणार?

ST Corporation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि भरघोस मतांनी यावर्षी महायुती विजयी झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी राज्याचा मुख्यमंत्रीचा शपथ विधी पूर्ण होणार आहे. हा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. तसेच महायुतीयोल मंत्री पदांची देखील घोषणा केली जाणार आहे. निवडणुका पार पडण्याआधी महायुती सरकारने नागरिकांना अनेक आश्वासने दिली होती.परंतु आता ही आश्वासने सरकार खरच पूर्ण करणार आहे का? की सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे.

एसटी महामंडळाचा हा निर्णय पाहता नवीन सरकारच्या काळात सर्वसामान्य माणसांचा प्रवास देखील महागणार असल्याची शक्यता आहे. कारण एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे 18 टक्क्यांनी भाडे वाढ करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. हा प्रस्ताव निवडणुकीआधी झाला होता. परंतु शिंदे सरकारच्या काळात हा होल्डर ठेवण्यात आला होता.

महामंडळाला दररोज 15 कोटींचा तोटा

महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाचा हा प्रस्ताव स्वीकारला तर मुंबई ते पुणे हा प्रवास 50 ते 60 रुपये महाग होणार आहे. याआधी 2021 मध्ये शेवटची भाडे वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटीच्या प्रवासात कोणतेही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. परंतु गेल्या अनेक दिवसापासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना दररोज 15 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे गरजेचे आहे. असे सांगितलेले आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतनात सातत्याने वाढ होत आहे. तसेच इंधनाचा दर देखील वाढत आहे. सुट्ट्या भागांची किंमत देखील वाढत आहे . सेच टायर आणि लुब्रिकंटचे दर देखील सातत्याने वाढत असल्याने एसटी महामंडळाने भाडे वाढ करण्याची गरज आहे, असे सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव सरकार पुढे पाठवलेला आहे. परंतु आता सरकारी यावर नक्की काय निर्णय घेणार आहे? हे पाहणे सगळ्यात महत्त्वाचे आहे