Staff Selection Commision Bharati 2024 | 10 वी आणि 12 पाससाठी थेट केंद्र सरकारची नोकरीची संधी, तब्बल 2049 पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Staff Selection Commision Bharati 2024 | एखाद्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावी शिक्षण पूर्ण झालेले असेल तर त्यांना नेहमीच त्यांच्या नोकरीची चिंता सतावत असते. सरकारी नोकरी तर सोडा परंतु अगदी साधी नोकरी मिळणे देखील त्यांना कठीण होत असते. परंतु आता तुमची जर दहावी आणि बारावी झाली असेल. किंवा अगदी तुम्ही पदवीधर असला तरी तुमच्यासाठी आता सरकारची एक मोठी सुवर्णसंधी आहे. कारण आता तुम्हाला केंद्र सरकारद्वारे नोकरी मिळण्याची संधी आहे. ही भरती केंद्र सरकारच्या मंत्रालयासाठी होणार असून स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commision Bharati 2024)ही भरती आहे. यासाठी आयोगाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे.

त्यामुळे आता या पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीद्वारे यावर्षी 2049 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर जाऊन या पदासाठी अर्ज करा.

कोणत्या पदांसाठी भरती होणार

  • लॅब अटेंडेंट
  • लेडी मेडिकल अटेंडंट
  • मेडिकल अटेंडंट
  • नर्सिंग ऑफिसर
  • फार्मासिस्ट फिल्डमन
  • डेप्युटी रेंजर
  • टेक्निकल असिस्टंट
  • अकाउंटंट
  • असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर
  • अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

एकूण रिक्त जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (Staff Selection Commision Bharati 2024)अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 2049 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर असलेले विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा | Staff Selection Commision Bharati 2024

उमेदवाराचे वय हे 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 42 वर्षात असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एससी आणि एसटी कॅटेगिरीसाठी पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे तर ओबीसी कॅटेगिरीसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे.

वय अर्ज शुल्क

स्टाफ सिलेक्शन कमिशन या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.