स्टेज 4 कॅन्सर असलेल्या महिलेला कामावर बोलावणं; बॉसचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।नोकरीच्या ठिकाणी आपला बॉस वागायला बोलायला कसा आहे ते महत्वाचे असते. जो बॉस आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतो त्याठिकाणी काम करायला आनंद वाटतो. परंतु जगात कामाच्या अनेक ठिकाणी असेही काही बॉस असतात ज्यांना कर्मचाऱ्यांचे काही देणं घेणं नसत, ते फक्त कंपनीचा विचार करतात. अशीच एक घटना एका कॅन्सरग्रस्त ५० वर्षीय महिलेच्या मुलीने सांगितली आहे. आपली आई स्टेज 4 कॅन्सरशी गेल्या 18 महिन्यांपासून लढत आहे आणि असं असूनही तिचा बॉस तिला कामावर बोलवत आहे असं म्हणत या मुलीने बॉसच्या मेसेजचा स्क्रिनशॉट सुद्धा शेअर केला आहे.

Reddit वर @disneydoll96 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुलीने म्हंटल कि, माझी आई गेल्या 18 महिन्यांपासून स्टेज 4 कॅन्सरशी लढत आहे. ती ज्याठिकाणी काम करते त्याठिकाणी सुद्धा तिच्या आजारपणाची संपूर्ण स्थिती माहिती आहे. मात्र असं असूनही तिला कामावर बोलवण्यात येत आहे. या मुलीने तिच्या आईच्या बॉसच्या ईमेलचा एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यामध्ये लिहिले आहे,”तुम्ही कामावर रुजू होण्यासाठी फिट आहात की नाही हे स्पष्ट करण्यासाठी कृपया तुमच्या ऑन्कोलॉजिस्टकडून एक पत्र मिळेल का? जर तुम्ही तंदुरुस्त असाल, तर तुमच्या ऑन्कोलॉजिस्टने हे सांगणे आवश्यक आहे की तुम्ही काही काम करू शकाल.. तुमची ट्रीटमेंट अजून पुढे सुरु राहणार असेल तर त्यानुसार आपण कामाचे नियोजन करू शकतो.. एवढच नव्हे तर कृपया उद्या दुपारी २ वाजता भेटायला या…आणि मिटिंगला उपस्थित रहा असा आदेश पत्राच्या शेवटी देण्यात आला आहे.

My Mum has stage 4 cancer in 5 areas and her boss has been pressuring her to come back to work.
byu/disneydoll96 inmildlyinfuriating

सदर मुलीची आई एका दुकानावर सुपरवायजर आहे. आणि बरी होऊन एक दिवस पुन्हा कामावर रुजू होईल अशी आशा त्या मुलीला आहे. कारण मुलीला वडील नाहीत आणि त्यामुळे आर्थिक पाठबळ म्हणावे तस नाही. परंतु एकदा का पदवीचे शिक्षण घेतलं कि ती सुद्धा नोकरी शोधणार आहे.

दरम्यान, या मुलीने शेअर केलेला स्क्रिनशॉट सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला, एका यूजर्सने त्यावर प्रतिक्रिया देताना म्हंटल, तिने गुपचूप मीटिंग्ज रेकॉर्ड कराव्यात आणि कंपनीला जसे आहे तसे दिसावे, तर दुसऱ्या एका यूजर्सने म्हंटल कि “मी नक्कीच असे म्हणणार नाही की तिच्या बॉसलाही कर्करोग झाला पाहिजे. पण मला खात्री आहे की हे खरोखर कठीण आहे.