Stambheshwar Mahadev : निसर्गाचा अद्भुत चमत्कार; भारतातील ‘हे’ शिवमंदिर दिवसातून 2 वेळा बुडते पाण्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stambheshwar Mahadev) संपूर्ण देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत. ज्यांचा इतिहास, गोष्ट, आख्यायिका अत्यंत वेगळ्या, रहस्यमयी आणि चकित करणाऱ्या आहेत. यामध्ये अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे. अत्यंत प्राचीन आणि पुरातन काळातील ही मंदिरं स्वतःतचं एक अजूबा आहेत. अशाच एका चमत्कारिक मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर महादेवाचे असून अत्यंत विशेष आहे. दिवसभरातून तब्बल २ वेळा हे शिवमंदिर आपल्या जागेवरून गायब होते. विश्वास बसणार नाही अशा काही खास गोष्टी या मंदिराबाबत सांगितल्या जातात. त्या आपण जाणून घेऊयात.

कुठे आहे चमत्कारिक शिवमंदिर ?

(Stambheshwar Mahadev) गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यात वडोदऱ्यामध्ये समुद्र किनारी हे शिवमंदिर वसले आहे. ज्याचे नाव ‘स्तंभेश्वर महादेव मंदिर’ असे आहे. हे अद्भुत मंदिर दिवसातून दोनदा आपल्या जागेवरून गायब होते आणि त्यामुळे या अनोख्या मंदिराला ‘गायब झालेले मंदिर’ असेही म्हणतात. हे शिव मंदिर नाहीसे होण्यामागे कोणताही चमत्कार किंवा इतर कोणता प्रकार नसून ही निसर्गाची किमया आहे.

२०० वर्ष मंदिराच्या गायब होण्याचे रहस्य

इथले स्थायिक असं सांगतात की, या मंदिराचा शोध सुमारे २०० वर्षांपूर्वी लागला होता. या मंदिरात स्थापन केलेल्या शिवलिंगाचा जलाभिषेक समुद्राच्या लाटा स्वतः करतात. भरतीच्या वेळी पाण्याच्या लाटा उसळत शिवलिंगाचा जलाभिषेक करतात. ही घटना दररोज सकाळी आणि संध्याकाळी घडते. हे मंदिर दिवसातून २ वेळा गायब होते असे म्हटले जाते. (Stambheshwar Mahadev)

तर हे मंदिर गायब होण्याचे कारण असे की, हे शिवमंदिर समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. त्यामुळे समुद्रात भरती आल्यावर संपूर्ण मंदिर समुद्रात बुडून जाते. तर समुद्राला ओहोटी आल्यावर पाणी ओसरते आणि मंदिराचे दर्शन होते. या नैसर्गिक क्रिया शतकानुशतके होत आहेत.

‘स्तंभेश्वर तीर्थ’ची आख्यायिका (Stambheshwar Mahadev)

स्तंभेश्वर महादेव मंदिराचेच्या बांधकामाची कथा स्कंदपुराणात वर्णन केलेली आहे. ज्यानुसार, तारकासुराने महादेवाची कठोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे भोळे शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तारकासुराला इच्छित वर मागण्यास सांगितले. या वरदानात तारकासुर राक्षसाने देवासोबत खेळी करू पाहिली. त्याने महादेवाचा फक्त ६ महिन्यांचा मुलगा आपला वध करू शकतो, असे वरदान मागितले. देवाने त्याला हे वरदान देताच तारकासुराने उतमात माजवला. तो सर्व देव, देवी आणि ऋषींना त्रास देऊ लागला.

ज्यामुळे त्रस्त होऊन देव आणि ऋषी महादेवाकडे पोहोचले. त्यांनी महादेवाला संरक्षणासाठी साद घातली. तेव्हा कार्तिकेयाने अवघ्या ६ महिन्याच्या वयात तारकासुराचा वध केला. (Stambheshwar Mahadev) तारकासुर हा महादेवाचा भक्त होता हे जाणताच कार्तिकेय निराश झाला. या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णू यांनी त्याला तारकासुराचा वध केला त्या ठिकाणी शिवमंदिर मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतरच सर्व देवांनी मिळून महिसागर संगम तीर्थ येथे विश्वानंदक स्तंभाची स्थापना केली. ज्याला आज ‘स्तंभेश्वर तीर्थ’ म्हणून ओळखले जाते.