हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक म्युच्युअल फंड (State Bank Mutual Fund) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) यांच्या सहकार्याने ‘जननिवेश SIP’ (Janniwesh SIP Scheme) ही नवीन गुंतवणूक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत देशभरातील नागरिकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक करण्याची संधी मिळणार आहे. ही गुंतवणूक फक्त 250 रुपयांपासून करता येणार आहे. यामुळे लोकांना म्युच्युअल फंडचे महत्त्व समजणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जननिवेश SIP मध्ये गुंतवणूकदारांना दररोज, साप्ताहिक आणि मासिक पद्धतीने गुंतवणूक करण्याचा पर्याय दिला जात आहे. ही योजना पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या, लहान बचत करणाऱ्या आणि ग्रामीण, निमशहरी तसेच शहरी भागातील छोट्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अधिकाधिक लोकसंख्येला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आर्थिक रक्कम निर्माण करण्याचा आहे.
कोठे करता येईल गुंतवणूक?
जननिवेश एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी SBI चा ‘योनो’ प्लॅटफॉर्म तसेच पेटीएम, ग्रो आणि झिरोधा यांसारखे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. यामुळे गुंतवणूकदारांना सहज, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने गुंतवणूक करता येईल. खास म्हणजे, या गुंतवणुकीची रक्कम फक्त 250 रुपये असणार आहे. त्यामुळे जे लोक मोठी गुंतवणूक करू शकत नाही त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल.
दरम्यान, एसबीआय म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ नंद किशोर यांनी म्हणले आहे की, “डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रथम गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही ही योजना फायद्याची ठरेल.” तसेच, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांनी या योजनेला योग्य वेळी घेतलेला निर्णय असल्याचे सांगितले आहे.