सुपनेत रविवारी राज्यस्तरीय पुरूष व महिलांच्या निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तालुक्यातील सुपने येथे श्री. पांडुरंग देवाच्या यात्रेनिमित्ताने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 2 वाजता सुपने ग्रामपंचायत मैदानावर कुस्त्या होणार आहेत. शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने व यात्रा कमेटी आणि ग्रामस्थ यांच्यावतीने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दहा कुस्त्या नामंकित मल्लाच्या होणार असून त्यासोबत महिलांच्याही कुस्त्या होणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील मल्ल सहभागी होणार आहेत.

सुपने येथे कुस्ती मैदानात पै. दिग्विजय जाधव (शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने) विरूध्द पै. अनिल ब्राम्हणे (छ. शिवराय कुस्ती केंद्र, पारणेर) यांच्यात पहिल्या क्रमाकांची 60 हजारांची कुस्ती होईल. तर दोन नंबरची कुस्ती पै. अक्षय मोहिते, बेलवडे बु (छ. शिवाजी आखाडा, कराड) विरूध्द पै. बाबा रानगे (मोतीबाग तालीम, कोल्हापूर) यांच्यात 51 हजार रूपये, तृतीत क्रमाकांची कुस्ती पै. रणजीत राजमाने (तालीम सैदापूर) विरूध्द पै. इंद्रजीत महदुम (मोतीबाग तालीम, कोल्हापूर), पै. साहिल पाटील ((शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने) विरूध्द पै. सागर काळे (छ. शिवराय कुस्ती केंद्र, पारणेर), पै. नितीन जाधव (मामासाहेब मोहोळ, कुस्ती संकुल पुणे) विरूध्द पै. शोऐब पटेल (शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने), पै. सुजित चव्हाण (शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने) विरूध्द पै. अक्षय ठोंबरे (तालीम संघ, सातारा), पै. निखील पाटील (शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने) विरूध्द पै. प्रदिप जाधव (किल्ले मच्छिंद्रगड), पै. प्रथमेश पाटील (शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने) विरूध्द पै. अंकुश मोहिते (रेठरे बु.), पै. अोंकार भोसले (शिवछत्रपती कुस्ती मैदान, सुपने) विरूध्द पै. वेदांत माने (सैदापूर) यांच्यासह अन्य महिला व पुरूषांच्या प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत.

सुपने येथे कुस्ती केंद्र असून राज्यातील मल्लांचे नेहमीच लक्ष वेधून घेत आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा कुस्त्यांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील मल्ल सहभागी होणार आहेत. तसेच महिलांच्याही कुस्त्या होणार आहेत.