जिल्हा वार्षिक योजनेत बदल करण्यात येणार : राजेश क्षीरसागर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जिल्हा वार्षिक योजनेमधील नाविण्यपूर्ण योजनेतून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे घेण्याबरोबर शाश्वत शासनाची मालमत्ता तयार व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी भर द्यावा. त्यानुसार या योजनेत बदल करण्यात येणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगाने नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, महाबळेश्वर, पाचगणी व कास पठार पर्यटनाच्या दृष्टीने निधीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत, त्याची माहिती द्यावी. म्हणजे त्या निधीबाबत पाठपुरावा केला जाईल. वासोटा येथे महाराष्ट्रातून ट्रेकींगसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करण्यात याव्यात. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावे. नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. यामध्ये ग्रामपंचायतींमधील सांडपाणी व्यवस्थापनापासून काम करावित. ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’चा जास्तीत जास्त गरजुंना लाभ द्यावा, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.