फलटणला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे निवेदन : सांगोला व कुर्डूवाडीतील आंदोलकांवर कारवाई करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी अनमोल जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या विरुद्ध सांगोला व कुर्डुवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रतिमेचे दहन करण्यात आले. या आंदोलनाच्या निषेधार्थ कारवाई करण्याची मागणीचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव आणि फलटण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांना फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध सांगोला व कुर्डुवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कृत श्रीमंत रामराजे यांच्या बद्दल जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांची बदनामी करण्यात आली. सांगोला येथे त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच कुर्डुवाडी येथे त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. समाजामध्ये अशांतता पसरविणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा आम्हाला देखील जशास तसे उत्तर द्यावे लागेल व आमच्या या कृत्यामुळे अशांतता पसरल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. समाजामध्ये अशांतता पसरवणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. योग्य ती कार्यवाही व्हावी असे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला रेश्मा भोसले, लतिका अनपट, राजश्री शिंदे, भावना सोनवलकर, नूरजहां सय्यद, सपना कोरडे, प्रतिभा चौधरी, रेखा माने, स्मिता खरात, उर्मिला काटे, स्वाती नाळे, लता यादव, गितांजली नावरे, अनिता कर्वे, पूनम भिसे, माया पवार, सुवर्णशीला कांबळे आदी महिला उपस्थितीत होत्या.