हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (रविवार) वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्थापन केलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. मात्र यावेळी सावरकरांच्या जयंतीसाठी महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत २ फोटो ट्विट करत सरकारला चांगलंच घेरलं आहे.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही असे म्हणत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
यावेळी रोहित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सुद्धा टीका केली. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का? असा सवाल करत रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.