हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, आजकाल तुम्ही कोणत्याही कारमध्ये कारसाठी दोन प्रकारची चाके बघितली असतील. एक स्टील- व्हील (Steel Wheel) आणि दुसरे अलॉय- व्हील (Alloy Wheel)…. जास्त करून आत्ताच्या काळात अलॉय व्हील्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. खास करून कमी बजेट असणाऱ्या कारमध्ये स्टीलची चाके दिली जातात तर टॉप मॉडेल्स किंवा प्रीमियम कारमध्ये अलॉय चाके पहायला मिळतात. आता या दोन्ही चाकांमधील जास्त फायदेशीर चाक कोणतं यावरून तुमच्या मनात गोंधळ उडाला असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला दोन्ही चाकांचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
स्टील व्हील्सचे फायदे-
१) स्टील व्हील्स हे अलॉय व्हील्सपेक्षा खूप मजबूत असतात . लोह आणि कार्बनच्या मिश्रणापासून बनवलेल्या या धातूमध्ये इतर अनेक घटक सुद्धा असतात ज्यामुळे ते मजबूत बनते.
२) किमतीच्या बाबतीत सुद्धा ते अलॉय व्हील्सपेक्षा स्वस्त असतात, त्यामुळेच त्याचा वापर कमी बजेट कारमध्ये सर्वात जास्त केला जातो.
३) हे चाक तुटण्याची किंवा क्रॅक होण्याची शक्यता कमी असते.
४) चांगली क्वालिटी तसेच कोणत्याही रस्त्यांवर बिनधास्तपणे धावण्याची तयारी यामुळे स्टील व्हीलची लाईफ जास्त असते.
५) याशिवाय स्टील व्हील खराब झालं तरी दुरुस्तीसाठी जास्त पैसे लागत नाहीत. त्यामुळे तुमच्या खिशातून फारसा खर्च होत नाही.
अलॉय व्हील्सचे फायदे –
१) अलॉय व्हील्स हे स्टील व्हील पेक्षा वजनाने खूपच हलके असते त्यामुळे कारला जास्त मायलेज मिळते.
२)अलॉय व्हील्सचा लूक स्टायलिश आणि स्पोर्टी असल्यामुळे कारच्या सौंदर्यात भर पडते.
३) अलॉय व्हीलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते गंज प्रतिरोधक असल्यामुळे गंजत नाही आणि स्क्रैच पडण्याची शक्यताही नसते.
४) रिपोर्टनुसार, स्टील व्हील पेक्षा अलॉय व्हील्स असलेल्या कारमधून राइड करणे खूपच आरामदायी वाटते.
स्टील व्हील्सचे तोटे-
१) स्टील व्हील्सचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते वजनाला जड आहे. त्यामुळे वाहनाच्या मायलेजवर मोठा फरक पडतो.
२) स्टील व्हीलचा लूक सुद्धा अत्यंत साधा आहे. त्याच्या तुलनेत अलॉय व्हील जास्त ट्रेंडमध्ये आहेत.
३) याशिवाय जर तुमची कार जुनी झाली किंवा तुम्ही त्याची नीट काळजी घेतली नाही तर स्टील व्हील गंजण्याची सुद्धा शक्यता असते.
अलॉय व्हील्सचे तोटे –
१) स्टीलच्या चाकांच्या तुलनेत अलॉय व्हील्स खूपच महाग असतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक झळ बसू शकते. कधी कधी दोन्ही चाकांमध्ये 50% फरक असतो.
२) अलॉय व्हील्स दिसायला कितीही सुंदर आणि स्पोर्टी असले तरी स्टीलच्या व्हील्सच्या तुलनेत जास्त मजबूत नसतात. अनेक वेळा अशा चाकण तडे जाण्याची भीती राहते.
३) याशिवाय अलॉय व्हील दुरुस्त करणे देखील महागात पडत.