Stock Market : बुल अन् बेअर मार्केट म्हणजे काय ??? यादरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : सध्या जागतिक बाजारात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारातही चढ-उतार होत आहेत. मात्र आता बुल मार्केट येणार कि बेअर मार्केट येणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे. चला तर मग आज आपण बुल मार्केट आणि बेअर मार्केट म्हणजे काय हे जाणून घेउयात. हे लक्षात घ्या कि, आर्थिक बाजारात तेजी असते तेव्हा त्याला बुल मार्केट म्हंटले जाते. बुल मार्केट अनेक महिने किंवा वर्षे टिकू शकतो.

Abstract Financial Chart With Bulls And Bear In Stock Market On Blue Colour Background Stock Illustration - Download Image Now - iStock

मात्र, बाजारातील काही दिवसांच्या वाढीला बुल मार्केट असे म्हणता येणार नाही. इथे हे लक्षात घ्या की, जेव्हा एखादा शेअर 20-20 टक्क्यांच्या दोन घसरणीनंतर 20 टक्क्यांनी वाढतो, तेव्हा तो बुल मार्केट असतो. सुरुवातीलाच बुल मार्केट ओळखणे जरा अवघड असते. याचे कारण असे कि, शेअर बाजार सतत अस्थिर असतो, ज्यामुळे स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज कधी खाली जातील हे सांगता येत नाही. Stock Market

बेअर मार्केट म्हणजे काय ???

जर वर जाणाऱ्या बाजाराचा कल विरुद्ध दिशेने गेला म्हणजे बाजारात दीर्घकाळ घसरण होत राहिली तर त्याला बेअर मार्केट असे म्हंटले जाते. हे लक्षात घ्या कि, जेव्हा अर्थव्यवस्था मंदावायला लागते तेव्हा अनेकदा बेअर मार्केट तयार होते. बेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार फक्त आपले पैसे काढून घेण्याचा आणि बाजारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. Stock Market

Abstract Financial Chart With Bulls And Bear In Stock Market On Blue Colour Background Stock Illustration - Download Image Now - iStock

अशा प्रकारे पडली नावे

साधारणपणे असे मानले जाते की, बुल आणि बेअर ज्या प्रकारे एखाद्यावर हल्ला करतात त्याच प्रकारे इथे त्याचे चित्रण केले गेले आहे. उदाहरणार्थ, बैल जेव्हा एखाद्यावर हल्ला करतो तेव्हा तो त्याला शिंगांनी उचलून वर फेकण्याचा प्रयत्न करतो. तसेच दुसरीकडे, जेव्हा अस्वल एखाद्यावर हल्ला करते तेव्हा ते वरून उडी मारून समोरच्या व्यक्तीला खाली दाबण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जेव्हा ट्रेंड वर जात असतो तेव्हा तो बुल मार्केट असतो आणि जेव्हा तो खाली येतो तेव्हा तो बेअर मार्केट असतो. Stock Market

अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे इंडिकेटर

हे जाणून घ्या कि, बुल मार्केट आणि बेअर मार्केट हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे इंडिकेटर आहेत. आर्थिक चक्रात 4 टप्पे असतात. उदय (एक्सपेंशन), शिखर (पीक), पतन (कॉन्ट्रेक्शन) आणि कुंड (ट्रफ). ट्रफ म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे खाली दर्शवते. बुल मार्केट वाढ दर्शवते. तर, बेअर मार्केट घसरण दर्शवते. Stock Market

Widescreen Abstract financial chart with bulls and bear in stock market on red and blue color background Stock Vector | Adobe Stock

या दरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे ???

बुल मार्केटमधून नफा मिळविण्यासाठी खरेदी करा आणि होल्ड करा हे धोरण अवलंबले पाहिजे. यादरम्यान आता स्टॉक खरेदी करा आणि नंतर विक्री करा. मात्र, यामध्ये गुंतवणूकदारांनी आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत शेअरची खरेदी करू नका. यानंतर, एका विशिष्ट मर्यादेत जास्त शेअर्सची खरेदी करून होल्ड करता येतील. तसेच, बेअर मार्केटमध्ये घाबरून जाण्याऐवजी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचबरोबर मजबूत स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा, जरी ते त्यावेळी घसरत असले तरीही. मात्र असे करत असताना, आपण किती काळ नुकसान सहन करू शकता याची जाणीव ठेवा. Stock Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/

हे पण वाचा :
Gold Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन सुविधा म्हणजे काय ??? त्याचे फायदे अन् जोखीम समजून घ्या
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती
Multibagger Stock : फायनान्स क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गेल्या 5 वर्षांत दिला 781% रिटर्न
Stock Tips : ‘हे’ 5 स्टॉक भविष्यात देऊ शकतील 45% पर्यंत रिटर्न, जाणून घ्या टार्गेट प्राइस
Multibagger Stock : गेल्या 3 वर्षांत ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सने दिला 3,900% रिटर्न