खटाव येथील चोरीला गेलेला ट्रक्टर सापडला : आरोपीस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वडी (ता. खटाव) येथील चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा छडा लावण्यात औंध पोलीसांना यश आले. या प्रकरणात सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिसांनी ट्रॅक्टर चोरट्याला गजाआड केले आहे. संशयित आरोपी हा पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील रहिवाशी असून एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडी येथील संदीप विष्णू येवले यांचा न्यू हाॅलंड कंपनीचा ट्रॅक्टर 21 आक्टोंबर रोजी रात्री चोरीला गेला होता. यामुळे खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिस संशयित आरोपी पर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणात पोलिसांनी सागर रामचंद्र मोरे (वय- 26 वर्षे, रा. भुडकेवाडी ता. पाटण) तसेच एक विधीग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. चोरीला गेलेला ट्रॅक्टरची किमत पाच लाख रुपये आणि दोन चोरीच्या मोटरसायकल अंदाजे किंमत 1 लाख रुपये असा 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा. पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहाय्यक फौजदार बी. एन. जाधव, सुभाष डुबल, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, राहुल वाघ, संतोष पाडळे, पंकज भुजबळ, महेश जाधव, जयवंत शिंदे, भिमराव वळकुंदे(मेजर), किरण जाधव, सागर पोळ, किरण हिरवे यांनी सहभाग घेतला.