Stomach Heat | उन्हाळा आला की तुमच्याही पोटात जळजळ होते का? करा ‘हे’ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Stomach Heat | नुकतेच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. उन्हाचा तडाका देखील जाणवत आहे. उन्हाळा आला की, उन्हाळ्यासोबत आरोग्याची संबंधित अनेक समस्या देखील येतात. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात डीहायड्रेशनची समस्या जास्त प्रमाणात जाणवते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांना अनेक आजार होतात. या काळात डॉक्टर आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायला त्याचप्रमाणे फळे खायला देखील सांगतात. परंतु अनेक लोकांना उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये पोटात जळजळ (Stomach Heat) जाणवते किंवा उष्णता वाटत असते. यावर नक्की काय करावे? हे देखील त्यांना कळत नाही. त्यांना दररोज अस्वस्थ वाटते. तर आज आपण पोटात जर जळजळ होत असेल किंवा उष्णता जाणवत असेल तर नक्की काय करावे हे जाणून घेऊया.

पोटात जळजळ होत असेल तर ती कशी कमी करायची? | Stomach Heat

  • उन्हाळ्यात दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्या.
  • ज्या फळांमध्ये जास्त रस असतो अशी फळे खा.
  • खास करून उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये टरबूज, खरबूज, कलिंगड या प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात विकली जातात. यामुळे हायड्रेशनची समस्या निर्माण होत नाही.
  • उन्हाळ्यामध्ये ताक प्यावे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात दुपारी सरबत, ताक लस्सी यासारखे पदार्थ पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या पोटातील जळजळ कमी होईल.
  • हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या खा. त्यामुळे उष्ण पोटातील उष्णता कमी होते आणि आपले शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. उन्हाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे.

पोटात जळजळ होत असेल तर कोणती लक्षणे दिसतात?

हाडांमध्ये वेदना

पोटातील उष्णता वाढली की, हाडांमध्ये वेदना जाणवतात आणि कडकपणा देखील येते. हाडांमधील आद्रता कमी होऊ लागते, त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात वेदना जाणवते. आपल्या हाडांमध्ये पाणी असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे ओलावा टिकून राहतो. आपल्या पोटातील जळजळ वाढली की, आपल्या शरीरातील पाणी कमी होते.

पाय आणि तळव्यामध्ये जळजळ

शरीरात जर पाण्याची कमतरता असेल, तर तुमच्या पायांच्या तळव्यांमध्ये देखील जळजळ निर्माण होते. जेव्हा तुम्ही झोपता, त्यावेळी जास्त जळजळ होते. तुम्ही याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे नंतर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रोज झोपताना थंड पाण्याने पाय स्वच्छ धुऊन झोपावे.

तोंडावर फोड येणे | Stomach Heat

तुमच्या शरीरातील उष्णता वाढली असेल, तर तुमच्या तोंडावर व्रण येत असतात. हे देखील पोटाच्या उष्णतेचे लक्षण आहे. त्यामुळे चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका. कारण पोटातील उष्णता (Stomach Heat) वाढल्याने पित्त होते आणि त्यामुळे हे फोड येऊ लागतात.

यातील कोणतेही लक्षण जर तुम्हाला जाणवले, तर तुम्ही अजिबात उशीर न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यावर उपचार करा. नाहीतर उन्हामुळे तुमच्या शरीरातील उष्णता आणखी वाढेल आणि तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल.