कोरोना संकटात माणुसकीचा जिवंत झरा …अन कोरोनाबाधित महिलेच्या मुलीला दिले कोरोना योध्याचे नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्ण असलेल्या आपल्या आई वडिलांना अग्नी देण्याचे काम सुद्धा त्यांची रक्ताची नाती करायला तयार नाहीत अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो आहोत. कोरोनाने माणसातलं माणूसपण हिरावून घेतल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. मात्र बीड मधल्या विजयसिंह बांगर यांचे कार्य पहिले की माणुसकीचा झरा अजूनही जिवंत आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

सध्या राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आहे. अस असताना अनेक संस्था आणि समाजसेवक पुढे येऊन आपले गरजूंना मदत करत आहेत. त्यातीलच एक कोरोना योद्धा म्हणजे बीड जिल्ह्यातील विजयसिंहा बांगर…’मी तसा श्रीमंत घरचा मुलगा आहे. त्यामुळे मी लोकांना मदत करू शकतो आणि मला समाज परिवर्तन करायचं आहे. या भावनेतून पेशाने सरपंच असलेले विजयसिंहा बांगर हे दिवसातले 24 तास गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी झटत आहेत.

https://www.facebook.com/VijaySinghBalaBangar/videos/371969520918366/

भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही.

‘भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही’. अस म्हणत बीड जिल्ह्यातील विजयसिंह बाळा बांगर यांनी कालच एका वयोवृद्ध आजीला जीवदान दिले आहे. गेल्या 2 दिवसांपासून एक आजी जनावरांच्या गोठयात पडून आहेत. ही बाब बांगर यांना समजताच त्यांनी या आजीला रुग्णालयात दाखल केले आहे. आणि एक आगळी वेगळी माणुसकी जपली आहे.

अन ‘त्या’ महिलेच्या मुलीचे नाव ठेवले विजयसिंहा

विजयसिंहा बांगर हे गेल्या काही वर्षांपासून हे काम करत आहेत. मात्र कोरोना काळात त्यांचं हे काम काम वाढलं आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात जवळपास 1 हजार रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले आहेत. तर जवळपास 550 गरीब नागरिकांच्या hrct टेस्ट स्वखर्चातून करून दिल्या आहेत. काल(१६ मे ) रात्री एका कोरोनाबाधित महिलेला रुग्णलयात दाखल केले आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कुटुंबीयांनी ही त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. तिथे विजयसिंहा भाऊ म्हणून या महिलेच्या पाठीशी उभे राहिले. या महिलेची प्रसूती झाली असून तिने जन्म दिलेल्या मुलीचे नाव विजयसिंहा यांच्या नावावरून विजया असे ठेवले असल्याचं बांगर यांनी सांगितलं..अशा गरजू नागरिकांसाठी देव बनलेल्या विजयसिंहा या कोरोना योध्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .

Leave a Comment